अवघ्या काही दिवसांवर नवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे. या ९ दिवसांमध्ये भाविक देवीची पूजा करताना दिसतात. हे तर झालं आपल्या वास्तविक जगातील. पण टेलीव्हिजनच्या बाबतीत बोलायचं झालं, तर अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी देवीची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.
चला तर मग लहान पडद्यावर म्हणजेच टेलीव्हिजनवर देवीच्या वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया…
नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर दाखवली जाणारी मालिका ‘ओम नम: शिवाय’ खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेत शंकराची भूमिका समर जय सिंगने, तर पार्वतीची भूमिका गायत्री शास्त्रीने साकारली होती. या मालिकेसाठी गायत्रीचे खूप कौतुक करण्यात आले होते.
आमिर खानचा चित्रपट ‘लगान’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ग्रेसी सिंगला मोठ्या पडद्यावर काही खास यश मिळाले नाही. त्यानंतर ती लहान पडद्याकडे वळली. २०१५ साली प्रसारित झालेली मालिका ‘संतोषी माँ’मध्ये ग्रेसीने मुख्य भूमिका साकारली होती. ग्रेसी सध्या ‘संतोषी माँ- सुनाए व्रत कथाएँ’मध्ये दिसत आहे. यात तिने संतोषी देवीच्या भूमिकेत दिसत आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनीला देवीच्या डान्स करतानाच्या भूमिकेत पाहिले आहे. याव्यतिरिक्त दूरदर्शनवर प्रसारित झालेली मालिका ‘जय माता दी’मध्येही हेमा मालिनीने मुख्य भूमिका साकारली होती. मालिकेत असे अनेक प्रसंग आले, जेव्हा हेमा मालिनीने क्लासिकल डान्सही केला होता.
सध्याच्या काळात मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर २०११ साली आलेली ‘देवों के देव महादेव’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली. मालिकेत पार्वतीची भूमिका अभिनेत्री सोनारिका भदौरियाने साकारली होती. मालिकेनंतर सोनारिका बॉलिवूड चित्रपट ‘सांसे’मध्ये दिसली होती.
https://www.instagram.com/p/XaA8Algup6/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/WfX6vcgujG/?utm_source=ig_web_copy_link
‘देवों के देव महादेव’मध्ये अभिनेत्री मौनी रॉयने देवी सतीच्या भूमिकेत दिसली. मालिकेत मौनी रॉयने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. यामध्ये तिच्यासोबत शंकराच्या भूमिकेत अभिनेता मोहित रैना होता.