बॉलिवूड कलाकारांची लग्न अगदी थाटामाटात पार पडत असतात. त्यांच्या लग्नात ते खूप पैसे खर्च करतात. या सगळ्यात बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री दिया मिर्झा हिचे लग्न खूप चर्चेत आले होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी दिया आई झाली आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात वैभव रेखीसोबत गुपचूप लग्न केले. लग्नानंतर तिने तिच्या प्रेग्नेंसीबाबत मौन तोडले होते. वैभव आणि दिया या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. त्यावेळी ती लग्नाच्या अनेक गोष्टींवरून चर्चेत आली होती. लग्नाच्या वेळेस सगळ्या विधी एका महिला पंडितने केले होते. तसेच ती तिच्या सावत्र मुलीसोबत स्टेजवर आली होती. त्यामुळे देखील ती खूप चर्चेत होती.
दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले आहे. तिने लग्नामध्ये लाल रंगाची साडी नेसली होती. नुकतेच तिने तिच्या लग्नातील एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमधूल तिची स्माईल तिच्या चाहत्यांना खूपच आवडली आहे. (dia mirza is winning hearts with her unseen wedding pictures in red saree)
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिया नवरीच्या वेशात घरात प्रवेश करत आहे. यामध्ये ती खूपच खुश दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदरही दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच डोक्यावर लाल रंगाची ओढणी घेतली आहे. यासोबत तिने ज्वेलरी परिधान केली आहे. तसेच कपाळी लाल रंगाची टिकली आणि बिंदी लावली आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. लग्नातील हा फोटो तिने अजून शेअर केला नव्हता. चाहते कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.
यावर्षी १४ मेला दिया आणि वैभव यांना मुलगा झाला आहे. त्यांनी एक पोस्ट करून सांगितले होते की, त्यांच्या मुलाचा जन्म अपेक्षित वेळेच्या आधी झाला आहे. त्यामुळे तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. दिया आणि वैभव यांनी त्यांच्या मुलाचे नाव अव्यान आझाद असे ठेवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…