Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड अर्जुन कपूर अन् जान्हवी कपूर यांनी ‘हटके’ फोटोशूट केलं शेअर, पाहायला मिळाली जबरदस्त बॉन्डिंग

अर्जुन कपूर अन् जान्हवी कपूर यांनी ‘हटके’ फोटोशूट केलं शेअर, पाहायला मिळाली जबरदस्त बॉन्डिंग

आपल्या मनोरंजन क्षेत्रात बरेच कलाकार एकमेकांचे नातेवाईक असल्याने आई-मुलगी, वडील-मुलगा, बहीण-भाऊ, बहिणी-बहिणी आदी बऱ्याच जोड्या पाहायला मिळतात. या जोड्या प्रेक्षकांना तुफान आवडतात देखील. मात्र यामध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांच्यात नाते तर नक्कीच आहे, पण तरीही त्यांच्या कोणताही संवाद नाही. तर अशा देखील काही जोड्या आहेत, ज्याच्यात भूतकाळात नक्कीच वाद होते मात्र ता मागील सर्व विसरून ते आनंदाने त्यांचे जुनेच नाते नव्याने निभावत आहे. अशीच एक भावाबहिणीची जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर.

अर्जुन आणि जान्हवी हे दोघे मागील काही वर्षांपासून या ना त्या कारणांमुळे मीडियामध्ये चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. श्रीदेवी यांच्या दुःखद निधनानंतर खुशी, जान्हवी, अर्जुन, अंशुला हे चौघे बहीण भाऊ खूपच जवळ आले. आता त्यांच्यात चांगले बॉन्डिंग बघायला मिळते. नुकतेच जान्हवीने तिचे आणि अर्जुन कपूरचे काही कमाल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

या फोटोमध्ये अर्जुन आणि जान्हवी अतिशय मस्त आणि मजेशीर पोज देताना दिसत आहे. पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसणारी ही भावाबहिणीची जोडी सध्या तुफान गाजत आहे. जान्हवीने तिच्या सोशल मीडियावरून तिचे आणि अर्जुनाचे चार फोटो शेअर केले असून या चारही फोटोंमध्ये त्यांच्या पोज पाहून आपल्याला नक्कीच हसायला येईल. हे फोटो अर्जुन आणि जान्हवीमधील भाव बहिणीचे सुंदर नाते आणि त्यांचे बॉन्डिंग दाखवत आहे.

या दोघांनी बाजार या मासिकासाठी हे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत असून, अर्जुन देखील हँडसम दिसत आहे. या फोटोंवर आतापर्यंत ७ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाइक्स केले असून हजारो कमेंट्स आल्या आहेत.

बोनी कपूर यांची पहिली पत्नी असलेल्या मोना कपूर यांचे अर्जुन आणि अंशुला हे दोन मुलं आहेत, तर बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या श्रीदेवी यांच्या जान्हवी आणि ख़ुशी या मुली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा