Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड सोशल मीडियावर व्हायरल होतोय सिद्धार्थ- कियाराचा ‘तो’ व्हिडिओ; चाहते म्हणतायेत, ‘तुम्ही लग्न करा’

सोशल मीडियावर व्हायरल होतोय सिद्धार्थ- कियाराचा ‘तो’ व्हिडिओ; चाहते म्हणतायेत, ‘तुम्ही लग्न करा’

सध्या मनोरंजन क्षेत्रात एका नवीन लव्हबर्ड्स खूपच गाजताना दिसत आहे, आणि ते म्हणजे कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. कियारा आणि सिद्धार्थ यांच्या अफेयर्सच्या चर्चा खूपच रंगत आहे. हे दोघेही ‘शेरशाह’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. येत्या १२ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या ही जोडी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट केली जात आहे. या दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात.

नुकताच या दोघांचा एक खूपच क्युट आणि रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थने कियाराला उचलून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ भिंतीला टेकून उभा आहे आणि कियारा ग्लॅमरस अंदाजमध्ये चालत येते, ते दोघं एकमेकांना बघताना लाजतात आणि सिद्धार्थ जवळ घेत तिला उचलून घेतो. असा हा खूपच गोड आकर्षक व्हिडिओ फॅन्सला खूपच पसंत पडत आहे. या दोघांचा हा रोमँटिक अंदाज पाहून फॅन्स त्यांच्यावर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव करत आहे. काही तासांपूर्वीच कियाराने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाइक्स आले आहेत. त्याच्या या व्हिडिओ फॅन्सकडून एक से बढकर एक अशा कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी त्यांना ‘तुम्ही लग्न करा’, ‘क्युट कपल’, अशा अनेक कमेंट्स दिल्या आहेत.

सिद्धार्थने देखील तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून त्याचे आणि कियाराचे काही रोमॅंटिक फोटो देखील शेअर केले आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांचा ‘शेरशाह’ हा सिनेमा येत्या १२ ऑगस्टला ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला असून, यात दिसणारी सिद्धार्थ आणि कियाराची केमेस्ट्री देखील खूपच गाजत आहे.

हा सिनेमा कारगिल युद्धातील हिरो असलेल्या विक्रम बत्रा यांच्यावर आधारित असून, या सिनेमात सिद्धार्थ विक्रम यांची भूमिका निभावत असून, कियारा त्यांच्या प्रेमिकाची भूमिका निभावत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा