Friday, November 22, 2024
Home मराठी मुलाला कडेवर घेऊन वहिनीसाहेबांनी ‘बचपन का प्यार’ गाण्यावर तयार केला व्हिडिओ, तेजस्विनी म्हणाली, ‘अगंबाई!’

मुलाला कडेवर घेऊन वहिनीसाहेबांनी ‘बचपन का प्यार’ गाण्यावर तयार केला व्हिडिओ, तेजस्विनी म्हणाली, ‘अगंबाई!’

झी मराठी या वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ ही घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील राणा आणि अंजली यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यासोबत आणखी एक पात्र चांगलेच प्रकाशझोतात आले होते, ते म्हणजे या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर. खलनायिकेच्या भूमिकेत असूनही धनश्रीचा प्रेक्षकांमध्ये चांगलाच दबदबा होता. तिची भूमिका खूप गाजली होती. धनश्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. तिच्या दैनंदिन जीवनातील अनेक माहिती सोशल मीडियावर देत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक गाणे चांगलेच गाजले आहे. ते म्हणजे ‘बचपन का प्यार’ होय. या गाण्याने सोशल मीडिया युजर्सपासून ते कलाकारांना भुरळ घातली आहे. या गाण्यावर अनेक रील्स समोर येत आहे. अशातच अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचा या गाण्यावरील एक व्हिडिओ समोर आला आहे. खास गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा देखील तिच्यासोबत दिसत आहे. ते दोघेही या व्हिडिओमध्ये अत्यंत क्यूट दिसत आहेत. ती तिच्या मुलाला कडेवर घेऊन या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. (dhanashri kadgaonkar’s bachpan ka pyar song video viral on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहले आहे की, “बचपन का प्यार, हे तर करायचेच होते.” त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने कमेंट केली आहे की, “अगंबाई.” तसेच सुयश टिळक, माधव देवचके यांसारख्या अनेक कलाकारांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.

धनश्रीने पहिल्यांदाच तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. धनश्रीने याच वर्षी तिच्या मुलाला जन्म दिला आहे. ती आणि तिचा पती ध्रुवेश यांनी त्यांच्या मुलाचे नाव कबीर असे ठेवले होते. त्यांनी त्यांच्या मुलाचे बारशाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

धनश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘चिट्ठी’, ‘गोवा ३५० किमी’, ‘ब्रेव्ह हार्ट’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘गंध फुलाचा गेला सांगून’ या मालिकेत काम केले आहे, पण ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने तिला खरी ओळख मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

-अन्विता फलटणकरला करावा लागला होता बॉडी शेमिंगचा सामना; म्हणाली, ‘लोक म्हणायचे जास्त खाऊ नको नाहीतर…’

-शाहरुख अन् दीपिकाच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ला आठ वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा