Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ जाधवने शेअर केले त्याचे ‘हटके’ लूकमधील फोटो; चाहत्यांकडून थेट रणवीर सिंगशी केली जातेय तुलना!

चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार असे असतात, ज्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप मेहनत घेतली. पण आज लहानांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांची ओळख आहे. असाच एक मराठामोळा अभिनेता म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेला अभिनेता आहे. आतापर्यंत अनेक विनोदी पात्र निभावून त्याने प्रेक्षकांना हसवले आहे. आज त्याने महाराष्ट्रातातील प्रत्येक माणसाच्या हृदयात घर बनवले आहे. चित्रपटासोबतच सिद्धार्थ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ तो शेअर करत असतो. अशातच त्याने त्याच्या आगळ्या वेगळ्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

सिद्धार्थ जाधवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर पिवळ्या रंगाचा सूट घातला आहे. तसेच त्याने पायात पांढऱ्या रंगाचे शूज आणि डोळ्यांवर पिवळ्या रंगाचा गॉगल लावला आहे. त्याच्या केसांची देखील वेगळीच स्टाईल केलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये तो एका पांढऱ्या रंगाच्या खुर्चीवर बसून पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तो अत्यंत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. यात तो बऱ्यापैकी देखणा दिसत आहे.

त्याच्या या फोटोवर अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने “लव्ह यू” असे लिहून हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तर सिद्धूने “आय लव्ह यू टू बंड्या” असा रिप्लाय दिला आहे. अमृता खानविलकरने “कडक” असे लिहिले आहे तर शिव ठाकरे याने फायर ईमोजी पोस्ट केली आहे. त्याचा हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. एका चाहत्याने तर त्याची तुलना थेट रणवीर सिंगशी केली आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, “महाराष्ट्राचा रणवीर सिंग” (siddharth jadhav’s new look viral on social media )

सिद्धार्थ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जत्रा’, ‘दे धक्का’, टाइम प्लिज, ‘खो खो’, ‘प्रियतमा’, ‘येरे येरे पैसा’, ‘ढोलकी’, ‘शिकारी’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘फक्त लढा म्हणा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. यासोबत त्याने हिंदीमध्ये ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’, ‘सिंबा’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

हे देखील वाचा