सध्या ‘बिग बॉस ओटीटी’चा बोलबाला सुरू झाला आहे. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात गोंधळ सुरू झाला आहे. या शोचे स्पर्धक एकमेकांसोबत वाद घालण्यात माहिर आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडणं होत असते आणि त्यानंतर घरात एकमेकांबद्दल वाईट बोलणे सुरू होते. असेच काहीसे मागील एपिसोडमध्ये ही घडलेले दिसून आले होते. जेव्हा भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग शमिता शेट्टीच्या वयाची चेष्टा करताना दिसून आली होती.
अक्षरा सिंगला अगोदर पासूनच शमिता आवडत नव्हती. अलीकडेच घरात एका टास्क दरम्यान अक्षराने शमितावर आरोप केला की, शमिता ही स्वतःला हाय-फाय दाखवून घरातील इतर सदस्यांवर वर्चस्व गाजवत आहे. ११ ऑगस्ट रोजी दाखवलेल्या एपिसोडमध्ये अक्षरा आणि उर्फी घरात आपापसात बोलत असल्याचे दाखवण्यात आले होते. त्याचबरोबर या एपिसोडमध्ये अक्षरा शमिताला ‘आंटी’ म्हटली होती.
इतकेच नव्हे, तर अक्षरा पुढे म्हणाली की, तिला माहित नव्हते की शमिताचे वय ४२-४३ वर्षे इतके आहे. ती मागील अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. शमिताच्या वयाबद्दल वक्तव्य करताना अक्षरा म्हणाली की, मोहब्बते चित्रपटाची अभिनेत्री तिच्या आईच्या वयाची आहे. यानंतर अक्षरा आणि उर्फी दोघेही हसायला लागतात आणि तिला ‘आंटी’ म्हणतात.
यानंतर अक्षरा असेही म्हणाली की, शमिता अनेकदा घरातल्या इतर लोकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते. ती घरातल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत आहे. यानंतर, उर्फी म्हणाली की, ती तिच्या स्वत:च्या मर्जीने गोष्टी चालवण्याचा प्रयत्न करत आहे. ती तिच्या सीझनमध्ये हारली होती ना, तिने काय केले? तिला तिचा सीझन जिंकता आला नाही आणि आम्हाला हुकूम देण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा अक्षराला हे ऐकून धक्का बसला की, शमिता याआधीही बिग बॉसचा भाग राहिली आहे. या अगोदरच शमिता आणि प्रतीक सहजपाल यांच्यात स्वयंपाकघराबाबत बरेच वाद पाहिले आहेत. शमिता या शोमध्ये म्हणाली की, तिला ओसीडीची समस्या आहे.
खरं तर शमिता २००९ मध्ये ‘बिग बॉस’ सीझन २ चा भाग होती. परंतु या दरम्यान ती शोच्या ३४ व्या दिवशीच घराबाहेर गेली होती. कारण याच दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या लग्नात तिला सहभागी व्हायचे होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’