बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चित्रपट येत आहेत. सत्य घटनांवर आधारित अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशातच स्वातंत्रदिनी प्रदर्शित होणारा देशभक्तीवर आधारित ‘शेहशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णू वर्धन आहेत. या चित्रपटाची कहाणी कारगिल युद्धातील शहिद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटातील एक किस्सा सध्या जोरदार चर्चेत आहे. ज्यामध्ये एका पाकिस्तानीने त्यांना विचारले की, “माधुरी दीक्षित आम्हाला द्या, आम्ही येथून निघून जातो.”
कारगिल युद्धात विक्रम बत्रा यांनी खूप धाडस दाखवले आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटातील एक सीन चांगलाच चर्चेत आहे. ज्यामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा त्यांच्या टीमसोबत पॉईंट ४८७५ साठी युद्ध लढत असतात. यामध्ये एक असा सीन दाखवला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचे बॉलिवूडबाबत आकर्षण दिसत आहे. पण यावर विक्रम बत्राने सडेतोड उत्तर देखील दिले होते. या सीनमध्ये पाकिस्तानने युद्धात एक वेगळीच मागणी केली. ते म्हटले की, “आम्हाला माधुरी दीक्षित द्या, देवा शप्पथ आम्ही सगळे इथून निघून जाऊ.”
ही गोष्ट ऐकून विक्रम बत्राने सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, “माधुरी दीक्षित तर सध्या दुसऱ्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण आता यावरच काम चालवून घ्या.” हे म्हणून ते दुश्मनांवर तुटून पडले. असे म्हटले जाते की, पाकिस्तानी जेव्हा माधुरी दीक्षितबाबत बोलले, तेव्हा विक्रम बत्रा यांनी त्यांना गोळी मारली. त्याआधी ते म्हणाले, “घे बेटा माधुरी दीक्षितकडून गिफ्ट.” (shershah vikram batra even famously refused to give madhuri dixit to the pakistani soldiers)
विक्रम बत्रा यांचा भाऊ विशाल याने २०१७ मध्ये हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, कशा प्रकारे पाकिस्तानी सैन्य विक्रम यांच्या संवादात अडथळे आणत होती. त्यांनी सांगितले की, “विक्रमच्या रिडिओला एका पाकिस्तानीने डिस्टर्ब् केले. तो विक्रमला चॅलेंज करत म्हणाला की, ये शेरशाह (हे त्यांचे कोडनेम होते) तिकडे जाऊ नकोस. नाहीतर तुझे नुकसान होईल. यावर विक्रम याना खूप राग आला की, एक पाकिस्तानी मला चॅलेंज करत आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “तिथेच थांब आम्ही एका तासात तुझ्या जवळ येतो.” तेव्हा त्या पाकिस्तानीने उत्तर दिले की, “तुम्हाला माहित आहे की, आम्ही येथे तुम्हाला मारायला आलो आहोत आणि तुमची सगळ्यात आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीला घेऊन जाणार आहोत.” या नंतर विक्रम बत्रा यांनी गोळीबार केला आणि म्हणाले की, “हे माधुरी दीक्षितकडून तुम्हाला गिफ्ट.”
‘शेरशाह’ हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. शहिद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात त्यांच्या बालपणापासून ते कारगिल युद्धापर्यंतचा सगळा प्रवास दाखवला आहे. माध्यमातील वृत्तानुसार विक्रम बत्रा यांच्या कुटुंबाला या चित्रपटात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा याला बघायचे होते. कारण त्या दोघांचे चेहरे अगदी मिळते जुळते आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’