Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोण आहेत शहिद कॅप्टन विक्रम बात्रांच्या प्रेयसी डिंपल, का आहेत आजही अविवाहीत?

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नुकताच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आपल्याला देशप्रेमाखातर जीवावर उदार होऊन शहिद झालेल्या एका महान योध्याची कहाणी पाहायला मिळणार आहे. ज्याने कारगिल युद्धात प्राणाची बाजी लावत देशाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. असे म्हटले जाते की, ‘एक सैनिक त्याचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जेवढे मोठे बलिदान देतो, तेवढेच मोठे बलिदान त्याचे कुटुंबीय घरी राहून देत असतात.’ आणि नक्कीच हे खरे आहे. कारण सैनिक घरापासून त्याच्या नात्यांपासून लांब असतो, तर परिवार त्याच्यापासून.

‘शेरशाह’ या सिनेमातून कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. सोबतच त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबियांचे त्यांच्याशिवाय राहण्याचे एक वेगळे युद्ध देखील पाहायला मिळणार आहे. शिवाय विक्रम बत्रा यांची एक सुंदर प्रेमकथा देखील आपण बघणार आहोत. विक्रम बत्रा आणि डिंपल चिमा यांची ही लव्हस्टोरी आणि विक्रम शहीद झाल्यानंतर डिंपल यांचे जीवन आपण यात पाहणार आहोत. या सिनेमात विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा तर डिंपल यांच्या भूमिकेत कियारा दिसणार आहे. (dimple cheema refused to marry anyone after vikram batra death)

कियाराने तिच्या या भूमिकेबद्दल सांगितले की, “डिंपल या माझ्यासाठी एक अनोळखी अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी एक लढाई तर लढलीच, शिवाय आयुष्यात पुढे येणाऱ्या सर्व संकटांचा धीराने सामना केला. डिंपल चिमा या भूमिकेने मला कोणत्याही अटीशिवाय प्रेम करायला आणि त्यावर विश्वास ठेवायला शिकवले. चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याआधी मी डिंपल यांना भेटले. जेव्हा मी त्यांना ऐकत होते तेव्हा मला असे वाटत होते की, मी त्यांना आधीपासूनच ओळखते. चित्रपटाच्या माध्यमातून मी त्यांच्या जीवनाचा भाग बनले.”

पुढे कियारा म्हणाली, “दिग्दर्शक विष्णूवर्धन यांनी सांगितले की, डिंपल साकारताना कोणाचीही नक्कल करू नको. आपण जेव्हा कोणाची नक्कल करतो तेव्हा त्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकत नाही असे मला वाटते. जर तुम्ही कथेसोबत भावनिकदृष्ट्या जोडले गेलात, तर तुम्ही आपोआप तुमच्या भूमिकेला न्याय देता. या सिनेमात काम करायला मिळाले ही माझ्यासाठी एक आयुष्यभराची भेट ठरली आहे. आम्ही शूटिंग सुरु होण्याच्या एक दिवस आधी बत्रा यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यामुळे भावनिक पद्धतीने आम्ही सर्वांशी आणि पर्यायाने कथेशी जोडले गेलो. हा सिनेमा सर्वच शहीद सैनिकांसाठी आमच्याकडून एक श्रद्धांजली आहे.”

दरम्यान ‘शेरशहा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, चित्रपटाबद्दल फॅन्स आणि कलाकारांकडून सिनेमा आवडल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहेत.

 

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवींनी अवघ्या ४ वर्षांच्या वयात ठेवले होते फिल्मी दुनियेत पाऊल; बॉलिवूडमध्ये घ्यायच्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक फी

अपरा मेहतांनी आपल्या अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने; तर एकाच व्यक्तीशी थाटला होता दोनदा संसार

झी मराठीवरील ‘या’ मालिकेत तिहेरी भूमिकेत झळकणार संकर्षण कऱ्हाडे, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

हे देखील वाचा