कोरोना महामारीमुळे गेल्या एका वर्षांपासून चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे या वर्षी अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. अनेक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामध्ये देखील अनेक अडचणी येत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, साऊथ अभिनेत्री नयनतारा हिचा ‘नेत्रिकन’ या चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. तसेच आता बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट लीक होण्याची बातमी समोर आली आहे.
अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर आणि एमी विर्क हे कलाकार असलेला ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट पायरेसीचा शिकार झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट प्रीमियर डिज्नी प्लस हॉटस्टारवर शुक्रवारी (१३ऑगस्ट) संध्याकाळी ५: ३० वाजता येणार होता. याआधीच हा चित्रपट टेलिग्राम, मुव्ही रुलज, तामिळ रॉकर्स आणि आणखी काही साईटवर ऑनलाईन लीक झाला. याचा प्रभाव या दिग्गज कलाकारांवर नक्कीच पडणार आहे. कारण यामुळे चित्रपटाला बघणाऱ्या दर्शकांच्या संख्येत घट होत आहे. (bhuj the pride of india ajay devgan, sanjay datt, starrer film leaked online for free download)
https://www.instagram.com/p/CSgWSlaocik/?utm_source=ig_web_copy_link
हा चित्रपट विजय कार्निक (अजय देवगण) यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये संजय दत्त रणछोडदास स्वभावी रावरी हे पात्र निभावत आहेत. त्यांनी युद्धात सैन्याला मदत केली होती. नोरा फतेही ही हीना रहमान नावाचे पात्र निभावत आहे. तर सोनाक्षी सिन्हा सुंदरबेन जेठ माधारपर्य नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या रूपात दिसत आहे. विजय कार्निकने स्थानिक महिलांच्या मदतीने गुजरातमधील नष्ट झालेल्या वायू सेनेच्या हवाई पट्टीचे पुनरागमन केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुधैया यांनी केले आहे. तसेच प्रणिता सुभाष आणि इहाना ढिल्लो या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’