दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची क्रेझ अगदी बॉलिवूडमध्ये देखील पाहायला मिळते. यातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अत्यंत बिनधास्त आणि सुंदर अभिनेत्री अशी साई पल्लवीची ओळख आहे. तसेच तिचे चित्रपट देखील प्रेक्षकांना प्रामुख्याने आवडत असतात. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती सर्वांना नेहमीच आकर्षित करते. पण अनेकांना ही गोष्ट माहित देखील नसेल की, साई पल्लवी ही पेशाने डॉक्टर आहे. परंतु अभिनयाकडे जास्त कल असल्याने तिने तिचे करिअर अभिनयात करण्याचा निर्णय घेतला. अशातच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला साई पल्लवीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे.
यूट्यूबवर साई पल्लवीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये साई शेतामध्ये चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने साडी परिधान केली आहे. तसेच ती चिखलात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच आनंदी आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठी उत्साही दिसत आहे. तसेच तिथे शेतात आजूबाजूला अनेक माणसं उभी राहिलेली दिसत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. यातून साईचा अभिनयासोबत इतर गोष्टीतील आवड देखील दिसून येत आहे.
https://youtu.be/oEOMh4yhNH0
साई पल्लवी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘फिदा’, ‘मारी २’, ‘काली’, ‘दिया’, ‘धाम धूम’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तिच्याकडे सध्या अनेक नवीन तमिळ प्रोजेक्ट आहेत. ती ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटात नागा चैतन्यसोबत दिसणार आहे. तसेच ती राणा दग्गुबती आणि शाम सिंघा रॉय नानीच्या समवेत ‘विराट पर्वम’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (auth actress sai pallavi’s video viral on youtube)
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनिल कपूरच्या घरात पुन्हा एकदा वाजणार सनई चौघडे, लाडकी लेक रिया लवकरच चढणार बोहल्यावर
-करीना कपूर खानला सरोगसीद्वारे हवं होत मुल, पती सैफने उघड केलं प्रेग्नेंसीपूर्वीचं ‘ते’ रहस्य