टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडल १२’ चे हे पर्व चांगलेच गाजले. मात्र या शोचा ग्रँड फिनाले गाजलासोबतच या फिनाले भागाने रेकॉर्ड देखील तयार केले. पहिल्यांदाच १० महिने चाललेल्या या शोने फिनालेच्या भागात सलग १२ तास चालून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी या शोचा ग्रँड फिनाले रंगला. या १२ तासांच्या भागात मंचावर स्पर्धकांनी अतिशय सुरेल गाणी सादर तर केली सोबतच या वेळी अनेक मजेशीर किस्से देखील घडले. असाच एक किस्सा घडला, इंडियन आयडलची अंतिम फेरीतील स्पर्धक असलेल्या सायली कांबळेच्या वडिलांसोबत.
शोचा ग्रँड फिनालेला विनोदाचा तडका देण्यासाठी कॉमेडीची महाराणी असलेल्या भारती सिंगने शो मध्ये येत तिच्या विनोदाने सर्वाना पोटधरून हसवले. या मंचावर भारतीने सायली कांबळेच्या वडिलांसोबत जबरदस्त फ्लर्ट केले. सायलीचे वडील मंचावर येताच भारतीने त्यांच्या कपाळावर किस केले. प्रकारामुळे सायलीची आई संतापते. ती भारतीपासुन सायलीच्या वडीलांना बाजुला घेते. पण भारती तिला पुन्हा हसत म्हणते, “यात जळण्यासारखे काय आहे, मी तर फक्त किस केले.” सायलीची आई पुन्हा म्हणते, “मी तुला किती वेळा सांगूनही तु तेच करत आहेस.” या क्षणाचा प्रत्येकजण खूप आनंद घेत आहे. यावेळी मात्र भारतीचा पती हर्ष तिच्यावर चिडलेला दिसला. तो म्हणतो, ” तू एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करू नकोस. तुला करायचे असेलत तर तु माझ्या सोबतचे संबंध तोड. त्यामुळे आणखी खळबळ उडाली. मात्र त्यानंतर हे सर्व मजामस्ती चालू असल्याने सर्वानीच हे प्रकरण हसण्यावारी घेतले.
या शोमध्ये फिनालेच्या भागात अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. त्यात कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, उदित नारायण, अलका याद्निक, कुमार सानू आदी अनेक मान्यवरांचा समावेश होता. पवनदीप राजनने या शोचे विजेतेपद पटकावले. तर अरुणित कांजीलाल ही या शोची पहिली रनर अप राहिली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘या’ कारणांमुळे नक्कीच पाहा अजय देवगणचा वायूदलाचे शौर्य सांगणारा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’
–परिणीती चोप्राला प्रचंड आवडतो सैफ अली खान; म्हणाली, ‘…मी लगेच हो म्हणू शकते’