Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘चांद सी मेहबूबा!’ सचिन पिळगावकर यांनी रोमँटिक अंदाजात दिल्या सुप्रिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रसिद्ध जोड्या आहेत. पण ९० च्या दशकापासून एक जोडी चांगलीच गाजली आहे. ती म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर होय. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. चित्रपटात रोमान्स करता करता ते दोघेही त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील रेशीम बंधनात अडकले आहेत. सोमवारी (१६ ऑगस्ट) सुप्रिया त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिला अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच त्यांचे पती अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या पत्नीला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुप्रिया पिळगावकर देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते अत्यंत रोमँटिक अंदाजात त्यांच्या पत्नीला शुभेच्छा देताना दिसत आहे. यामध्ये ते ‘चांद सी मेहबूबा’ हे गाणे गाताना दिसत आहेत. तसेच त्यांनी सुप्रिया यांना एक पुष्पगुछ दिला आहे. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यामध्ये सचिन पिळगावकर यांनी पांढरा टी-शर्ट आणि डोक्यात टोपी घातलेली दिसत आहे. तसेच सुप्रिया यांनी हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना तसेच कलाकरांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओवर स्वप्नील जोशीने कमेंट केली आहे की, “केवळ कमाल! हॅपी बर्थडे ताई.” (sachin pilgaonkar give best wishesh to supriya pilgaonkar on her birthday )

सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील बहुगुणसंपन्न कलाकार आहेत. त्यांचा गायन, डान्स, अभिनय, दिग्दर्शक, निर्माते या सगळ्यात मोलाचा हातखंड आहेत. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘एकुलती एक’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आम्ही सातपुते’, ‘नवरा माझा करोडपती’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तृतीयपंथीयांवर केलेला विनोद कॉमेडियन, अभिनेता असलेल्या वीर दासच्या आला अंगाशी, सोशल मीडियावर मागावी लागली माफी

अरे बापरे! भारती सिंगने भर शोमध्ये ‘या’ स्पर्धकाच्या वडिलांना केले ‘किस’, आईची या प्रकरणावर ‘ही’ होती रिऍक्शन

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

हे देखील वाचा