बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोनी टीव्हीवर सुरू असलेल्या ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ ची परीक्षक आहे. परंतु शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणात अटक झाली आहे. त्यामुळे या शोच्या निर्मात्यांनी आणि शो प्रसारित करणार्या वाहिनीने तिला शूटिंगला न येण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यानंतर मंगळवारी (१७ ऑगस्ट) रियॅलिटी डान्स शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या सेटवर परतली आहे.
कारण राज कुंद्राचा जामीन खटला लांबणीवर पडलेला पाहून शिल्पाने शूटिंगवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सध्या चर्चित असलेला विषय म्हणजे राज कुंद्रा आणि पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरण हा आहे. त्याचबरोबर शिल्पाच्या टीमने प्रसार माध्यमांद्वारे काही दिवसांपूर्वी एक खुलासा केला होता. तो म्हणजे शिल्पाचा तिच्या पतीच्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही. यासंदर्भात मुंबई पोलिसांना जे काही पुरावे सापडले आहेत, त्यावर कारवाई झाल्यानंतरच या सर्व घटनेचा खुलासा होईल. (Actress Shilpa Shetty returns to the set of ‘Super Dancer 4’, will resume shooting for the show)
रियॅलिटी डान्स शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या सेटवर उपस्थित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी या आठवड्याच्या शेवटी प्रसारित होणाऱ्या शोमध्ये परीक्षक म्हणून परत येणार आहे. मंगळवारी (१७ ऑगस्ट) जेव्हा शिल्पा शेट्टी या शोच्या सेटवर दिसली, तेव्हा एकच खळबळ उडाली होती. शिल्पा शेट्टी शूटिंगमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती शोच्या निर्मात्यापैकी कोणालाच नव्हती. फक्त या शोच्या स्क्रिप्ट रायटरलाच याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्याचबरोबर त्याने शिल्पा शेट्टीच्या शोमधील उपस्थितीनुसार मंगळवारी शूट होणाऱ्या एपिसोडची स्क्रिप्टही लिहिली होती.
सोनी टीव्हीने यावेळी यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. परंतु शोशी संबंधित सूत्रांचे मत आहे की, या शोचे निर्माते आणि शोचे प्रसारक यांच्यात गेल्या आठवड्यात एक बैठक झाली होती. या बैठकीनंतरच शिल्पा शेट्टीला शोमध्ये परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर अनु मलिकला देखील ‘इंडियन आयडल’च्या शोमध्ये परत आणण्याचा निर्णय ही त्याच कायदेशीर टीमशी सल्लामसलत केल्यानंतर घेण्यात आला होता. असे ही म्हटले जात आहे की, शिल्पा शेट्टी आता या शोचे शूटिंग सुरू ठेवणार आहे.
शिल्पा शेट्टी मंगळवारी (१७ ऑगस्ट) सेटवर पोहोचल्यानंतर तिथल्या वातावरणात चांगलीच खळबळ उडाली होती. शिल्पा शेट्टीची गाडी फिल्मसिटीच्या गेटमध्ये शिरताच सेटवर काम करणाऱ्या लोकांना मोबाईल कॅमेरे न वापरण्याचा इशारा देण्यात आला होता. सेटवर पोहोचल्यानंतर, शिल्पा शेट्टी थेट तिच्या मेकअप रूममध्ये गेली. दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी दीर्घ सल्लामसलत केली. शोच्या इतर परीक्षकांनीही शिल्पाची विचारपूस केली आणि त्यानंतर सेटवर परत येणे योग्य पाऊल असल्याचे सांगितले.
मागील काही दिवसांपूर्वीच ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या रियॅलिटी डान्स शोचे परीक्षक अनुराग बासू यांनी शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टीची आठवण काढली होती. ते म्हणाले होते की, ‘शिल्पा शेट्टी सेटवर नसल्यामुळे कोणालाही काम करायला उत्साह येत नाही.’ अनुराग शोच्या निर्मात्यांना एका कुटुंब प्रमुख मानत म्हणाले होते की, ‘कुटुंबातील एकही सदस्य नसणे खूप त्रासदायक आहे. विशेष म्हणजे, शिल्पा शेट्टीच्या अनुपस्थितीत.’
इतर अनेक चित्रपट कलाकारांनी तिचे स्थान पाहुणे जज म्हणून घेतले होते. मिळालेल्या वृत्तानुसार, सोनी चॅनलवरील शो ‘इंडियन आयडल’ विजेता पवनदीप राजन आणि या शोचे इतर अंतिम स्पर्धकही मंगळवारी (१७ ऑगस्ट) फिल्मसिटीमध्ये सुरू असलेल्या शूटिंगमध्ये सहभाग घेणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच