Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जॉबलेस असल्यावर ‘ही’ गोष्ट करते रश्मिका मंदाना; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘क्रश्मिका’

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. रश्मिका आपल्या चाहत्यांसाठी नेहमी व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. त्याचबरोबर तिने पोस्ट केलेल्या काही फोटो किंवा व्हिडिओमुळे ती नेहमीच चर्चेत येते. अलिकडेच रश्मिकाचे तब्बल २० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. त्याबद्दल तिने एक सुंदर पोस्ट देखील केली आहे. रश्मिकाने यासह तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.

या फोटोमध्ये तिने साडी घातली आहे. त्याचबरोबर तिने तिच्या डोक्यावर फुलांचा मुकुट घातला आहे. ज्यामध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते तिला रश्मिका ऐवजी ‘क्रश्मिका’ म्हणत आहेत.

रश्मिकाने हे सर्व फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खुर्चीवर बसून मनमोकळेपणाने हसत आहे. त्याचबरोबर तिने हे फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, “तुम्हाला जे आवडते, ते तुम्ही निवडा.” तसेच तिने पुढे असेही म्हटले आहे की, “जेव्हा शूटदरम्यान मला काही काम नसते, तेव्हा मी हेच करते.” रश्मिका मंदानाच्या या फोटोला आतापर्यंत ३२ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणाऱ्या रश्मिका मंदानाने तिच्या इंस्टाग्रामवर २० दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. ज्याचा तिने आनंद व्यक्त केला होता. त्याचबरोबर त्याचा व्हिडिओही तिने शेअर केला होता. यामध्ये व्हिडिओमध्ये तिचा लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. बेबी रश्मिका या व्हिडिओमध्ये खूपच गोंडस आणि निरागस दिसत होती. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तिच्या काही आवडत्या चित्रपटांचे पोस्टर आणि रश्मिकाचे काही अलीकडील फोटोशूटचे फोटो होते.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर रश्मिका मंदाना लवकरच ‘पुष्पा’ चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तिने ‘आयकॉन’ चित्रपटात काम केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. मात्र, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा चित्रपट सध्या प्री-प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे. टॉलिवूड नेट वेबसाईटनुसार, रश्मिका मंदानाला निर्माते वासूच्या ‘आयकॉन’ चित्रपटासाठी ऑफर दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेसचा तडका! टीना दत्ताच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पांढऱ्या मोनोकनीत दिल्या हटके पोझ

-खरं की काय? दीपिका पदुकोण चक्क अंतिमसंस्कारांच्या वेळी घातलेल्या कपड्यांचे करते लिलाव?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

-निसर्गाच्या सानिध्यात हरवलीय पूजा सावंत, फोटो शेअर करत म्हणतेय, ‘जिथे जाल तिथे…’

हे देखील वाचा