भोजपुरी चित्रपटसृष्टीतील गायक रितेश पांडे हा उत्कृष्ट आवाजासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो गायनाव्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये काम देखील करतो. अलिकडेच त्याच्या बहुचर्चित आणि देशभक्तीपर चित्रपट ‘सरफरोश’मधून एक गाणे रिलीझ करण्यात आले आहे. त्याचे ‘१८+’ हे गाणे रिलीज झाले आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर जबरदस्त धमाका करत आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री ईशा गुप्ता आहे. या गाण्यात ईशाची सुंदरता पाहून प्रत्येकजण तिच्यावर फिदा झाला आहे.
व्हीवायआरएल यूट्यूब चॅनेलवर रिलीझ केलेल्या रितेशच्या ‘१८+’ गाण्याला एकाच दिवसात ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ९.९ हजारांहून अधिक लाईक्स देखील मिळाल्या आहेत. या गाण्याचे अनोखे शीर्षक देखील चाहत्यांना आकर्षित करत आहे. त्याचवेळी, बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री ईशाच्या डान्सने सर्वांना भुरळ घातलीय. व्हिडिओमध्ये ती खूप सुंदर आणि क्लासी दिसत आहे. (Fans are happy to see the song of ‘Sarfarosh’ in Bhojpuri film industry)
अलीकडेच रितेश पांडेच्या भोजपुरी चित्रपट ‘सरफरोश’ मधील ‘उथई जानकी गजरा’ हे गाणे बी४यु भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज झाले आहे. या व्हिडिओ गाण्यात अभिनेता रितेश पांडे अभिनेत्रीसोबत लग्नाचा विधी करताना दिसला आहे. रितेश पांडे, प्रवेश लाल यादव, अंशुमन सिंग, यामिनी सिंग, दीपक भाटिया आणि नीरज शर्मासारखे अभिनेते या चित्रपटात दिसणार आहेत. त्याचबरोबर असे सांगितले जात आहे की, रितेश पांडे देखील चित्रपटात धोकादायक स्टंट करताना दिसणार आहे.
यासोबतच त्यांच्या ‘एमएलए दर्जी’ या चित्रपटाचा ट्रेलर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रिलीझ करण्यात आला होता. हा व्हिडिओ जबरदस्त कॉमेडीचा डोस आहे. रितेश पांडे, चांदनी सिंग आणि मणी भट्टाचार्य स्टारर चित्रपट ‘एमएलए दर्जी’ या चित्रपटात जबरदस्त कॉमेडी पाहायला मिळणार आहे. त्याचा हा ट्रेलर व्हिडिओ वर्ल्डवाइड रेकॉर्ड भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आला आहे. ज्याला खूप चांगले व्ह्यूज मिळत आहेत. ट्रेलर पाहून प्रेक्षकही चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?