सोशल मीडियावर कलाकार जेवढे सक्रिय असतात, तेवढे स्टारकिड देखील असतात. स्टारकिड्समध्ये नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी आणि चर्चेत असणारी स्टारकिड म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. मित्रांसोबत फिरताना एन्जॉय करताना ती फोटो शेअर करत असते. अशातच सुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे. ज्याला चाहत्यांची भरभरून पसंती मिळत आहे.
सुहानाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. सुहाना या दिवसात पोर्तुगालमध्ये फिरायला गेली आहे. तेथील काही फोटोज् तिने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुहानाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. तिच्या या ड्रेसची आणि लूकची सोशल मीडिया सध्या जोरदार चर्चा चालू आहे. (Suhana khan looks stunning in black dress on Poutugal vacation)
तिचा हा साधा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. बहुतांश वेळा सुहाना अगदी साध्या वेशात दिसते, यावरून तिला साधेपणा आवडत असावा असा आपण अंदाज लावू शकतो. सोशल मीडियावर तिचे चाहते सातत्याने तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. सुहानाने अजूनही पोर्तुगालमधील तिच्या ठिकाणाचा खुलासा केला नाही. पण असा अंदाज लावला जात आहे की, ती तिच्या मित्रांसोबत सुट्ट्या एन्जॉय करायला गेली आहे.
सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने बॉलिवूडमध्ये अजून प्रवेश देखील केला नाही. पण तिची फॅन फॉलोविंग एखाद्या कलाकारापेक्षा कमी नाहीये. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. मागच्या वर्षी तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट सार्वजनिक केले आहे. त्यानंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. सुहानाला तिच्या बोल्ड फोटोमुळे अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. शिवाय अनेकवेळा ती तिच्या मैत्रिणींसोबत स्पॉट होत असते. शनाया कपूर, अनन्या पांडे आणि नव्या नंदा या सुहानाच्या खास मैत्रिणी आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-