असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. प्रेम कधीच कसला विचार करीत नाही. ते बेधडक असतं सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे… जिथे दिसेल त्या मार्गाने पुढे निघून जात. मग त्याच्या वाटेत आड येणाऱ्या अडचणींचा ते कधीच विचार करत नाही. म्हणून तर प्रेमाला मुक्त म्हटलं जातं. बॉलिवूड मध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी विवाहित कलाकारांवर प्रेम केलं आणि त्यांच्याशीच लग्न देखील केलं परंतु त्यांचा आधीच संसार मात्र यामुळे मोडलं गेला. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन अनेकांनी या अभिनेत्रींशी दुसरं लग्न केलं. काहींनी तर आधीच घटस्फोटित असलेल्या पुरुषांवर प्रेम करून त्यांच्या आयुष्यात नवा आनंद आणला. तर अशा अभिनेत्री आणि कलाकार कोण आहेत चला तर मग जाणून घेऊयात.
हेमा मालिनी – धर्मेंद्र
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आहे. या दोघांना सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजिता अशी चार मुलं आहेत. धर्मेंद्र आधीपासूनच विवाहित आहेत हे माहीत असून सुद्धा हेमाजी त्यांच्या प्रेमात पडल्या. धर्मेंद्रजी देखील कुठे मागे पडणार होते, ते सुद्धा हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिली पत्नी जीवित असताना धर्मेंद्र यांना दुसरं लग्न करता येणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि यानंतर त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. या दोघांना इशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.
विद्या बालन – सिद्धार्थ रॉय कपूर
डिसेंबर २०१२ मध्ये विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे दोघे जण विवाहबंधनात अडकले. विद्याचं जरी हे पहिलंच लग्न असलं तरी सिद्धार्थ यांचं हे पहिलं लग्न नव्हतं. विद्या बालन या त्यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. सिद्धार्थ रॉय कपूर यांचा पहिला विवाह त्यांची बालमैत्रिण आरती बजाज यांच्याशी झाला परंतु हे लग्न फारसं टिकलं नाही. यानंतर सिद्धार्थ यांनी टीव्ही निर्मात्या कविता यांच्याशी दुसरं लग्न केलं परंतु २०११ मध्ये हे लग्नदेखील मोडलं. यानंतर मात्र विद्या बालनसोबत लग्न केलं आणि आज आठ वर्षानंतर दोघेही सुखी संसार करताना दिसत आहेत.
शिल्पा शेट्टी – राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी यांनी उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता आहे. कविताने शिल्पावर घर तोडल्याचा आरोप केला होता. परंतु हा आरोप शिल्पाने पूर्णपणे फेटाळून लावला. यावर शिल्पा म्हणाली की, ‘मी राजच्या आयुष्यात तेव्हा आले जेव्हा कविता आणि राजमध्ये सारं काही सुरळीत सुरू नव्हतं.’ शिल्पा आणि राज यांनी २००९ मध्ये लग्न केलं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना वियान नावाचा मुलगा आहे. त्याच वेळी सरोगसीच्या माध्यमातून त्यांची मुलगी समीशाचा हिचा जन्म झाला.
श्रीदेवी – बोनी कपूर
चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवीला पाहून बोनी कपूर त्यांच्या प्रेमात पडले. बोनी कपूर हे जेव्हा श्रीदेवींच्या प्रेमात पडले तेव्हाच खरं तर ते विवाहित होते. बोनी यांचा पहिला विवाह मोना कपूर यांच्याशी झाला. या दोघांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं सुद्धा होती. परंतु श्रीदेवी यांच्या प्रेमात पार बुडालेल्या बोनी यांनी मोना यांना घटस्फोट दिला आणि श्रीदेवीशी दुसरं लग्न केलं. या दोघांना जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत.
सैफ अली खान – करीना कपूर
सैफ अली खान याचा पहिला विवाह त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी झाला होता. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहेत. परंतु काही वर्षांनी सैफ आणि अमृता यांच्यात मतभेद होऊ लागले आणि दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. यानंतर अनेक वर्षे डेट केल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूर हिच्याशी २०१२ मध्ये लग्न केलं. या दोघांना तैमुर हा मुलगा झाला असून करीना पुन्हा एकदा गर्भवती राहिली आहे. तर सैफ मात्र चौथ्यांदा बाबा होणार आहे.