Tuesday, August 5, 2025
Home अन्य Bigg Boss OTT: दुसऱ्या वीकेंडच्या वारने सर्वांनाच केले चकित, करण नाथ- रिध्दीमा पंडितचं कनेक्शन झालं बेघर

Bigg Boss OTT: दुसऱ्या वीकेंडच्या वारने सर्वांनाच केले चकित, करण नाथ- रिध्दीमा पंडितचं कनेक्शन झालं बेघर

‘बिग बॉस ओटीटी’चे नवे पर्व दणक्यात सूरू झाले. या शोच्या निमित्ताने करण जोहरने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. करण पहिल्यांदाच या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला आहे. बिग बॉसबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता होती. स्पर्धक, नवीन फॉरमॅट, नवीन वाद, नवीन किस्से आणि अनेक मसालेदार गोष्टी या शोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

या शोमध्ये येणारा प्रत्येक स्पर्धक जरी मेकर्सच्या निर्णयामुळे आला असला , तरी त्या स्पर्धकाला शोमध्ये टिकवणे हे केवळ प्रेक्षकांच्या हातात असते. शोचा पहिला आठवडा दणक्यात पार पडला. आता दुसऱ्या आठवड्यामधून दोन स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे.

करण नाथ- रिध्दीमा पंडित
करण आणि रिध्दीमा गेली दोन आठवडे ‘बिग बॉस’च्या घरात जबरदस्त कामगिरी करत होते, परंतु यावेळी ते आश्चर्यकारक काहीही करू शकले नाहीत. या दोघांना सर्वाधिक कमी मते मिळाली. यामुळे शोमधून या दोघांना बेघर केले गेले आहे. करण जोहरच्या या घोषणेमुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सर्व स्पर्धकांना धक्का बसला. एवढेच नाही, तर करण देखील यावेळी प्रचंड दुःखी झाला. चाहत्यांचे आवडते स्पर्धक बेघर झाल्याने, बिग बॉस आता नवे वळण घेणार का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

करण आणि रिध्दीमा बेघर झाल्याने सर्व स्पर्धकांच्या डोळ्यात अश्रू आले. तसेच प्रतीक, अक्षरा आणि शमितासह इतर स्पर्धक रडताना दिसले. करण नाथच्या बेघर होण्यावर करण जोहर भावुक झाला. तो म्हणाला, “करणच्या गोड स्वभावामुळे, तो जाताना पाहुन सर्वांना दुःख होत आहे.” दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. या विशेष प्रसंगी राखी सावंतने हजेरी लावली होती. राखीने कलाकारांचे अभिनंदन केले, तसेच ती ‘बिग बॉस’मध्ये काही काळासाठी मनोरंजनाचा तडका लावून निघून गेली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा