बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आणि अभिनेते भारतातील इतिहास तसेच संस्कृती आणि आपले विचार यांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करत असतात. अशातच अनेकांना आपल्या कारकिर्दीमध्ये उतरत्या आलेखाचाही सामना करावा लागतो. भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक, निर्माता राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. मोठमोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. त्यांच्या खास चित्रपटांमध्ये ‘सत्य’, ‘भूत’, ‘सरकार’, ‘डरना मना है’, ‘डरना जरूरी है’ आणि ‘एक हसीना थी’ यांचा समावेश आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील त्यांची कारकीर्द आधी पेक्षा थोडी मंदावलेली दिसत आहे. परंतु त्यांचे चाहते आजही त्यांच्या चित्रपटाची वाट पाहत असतात. तसं पाहिलं तर, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याविषयी सोशल मीडियावर फार चर्चा नव्हती. परंतु आता एका व्हिडिओमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
एक महिला लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एका पुरुषाबरोबर डान्स करताना दिसत आहे. त्या महिलेचा वाढदिवस आहे. तसेच तो पुरुष त्या महिलेला स्वतःकडे ओढत तिच्याबरोबर डान्स करत आहे. तसेच डान्स करताना तो पुरुष त्या महिलेच्या पाया पडत आहे. या विडिओमध्ये आणखी एक महिला पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्येे सर्वजण वाढदिवस साजरा करत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणारा पुरुष राम गोपाल वर्मा यांच्या सारखा दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये याच व्हिडिओची चर्चा सुरु आहे. या व्हिडिओमुळे त्यांना चांगलंच ट्रोलही केलं जात आहे. (ram gopal varma video dancing with girl goes viral rgv says it s not me)
राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडीओ पाहताच यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले की, “गणपती, येशू, बालाजी यांच्यासह मी, इतरही सर्व देवांची शप्पत घेऊन सांगतो, तो मी नाही.” व्हिडिओमध्ये दिसत असलेला पुरुष हा हुबेहुब राम गोपाल वर्मा यांच्यासारखा दिसत असल्याने अनेकांना तो राम गोपाल वर्माच आहे असं वाटत आहे.
This video of me circulating on social media ,I swear on Balaji,Ganpathi ,Jesus etc etc is not me ???????????? https://t.co/yk1mJOefDR
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 21, 2021
राम यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये काही तालिबानी एका घरामध्ये धुमाकूळ घालताना दिसत होते. तसेच ते खुर्चीवर विचित्र पद्धतीने बसले होते. त्यांच्या जवळ असलेले जेवण देखील ते चुकीच्या पद्धतीने खात होते. तो व्हिडिओ पोस्ट करत राम गोपाल वर्मा यांनी तालिबान्यांची तुलना जनावरांसोबत केली होती.” अनेक नेटकरी त्यांच्या तालिबानी पोस्टचा आणि डान्सच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा सबंध लावत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज