Monday, October 27, 2025
Home अन्य ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये भुताचा ‘साया’? काय आहे नेमकी भानगड?

‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये भुताचा ‘साया’? काय आहे नेमकी भानगड?

सध्या सुरू असलेला ‘बिग बॉस ओटीटी’ चा दुसरा आठवडा खूप मनोरंजक होता. शोचा होस्ट करण जोहरने ‘संडे का वार’ हा एपिसोड पार पडला. ज्यामध्ये त्याने स्पर्धकांसोबत मजा केली आणि त्यांना चांगलेच फटकारले देखील. त्याचवेळी ड्रामा क्वीन राखी सावंत देखील शोमध्ये पोहोचली. राखीला पाहिल्यावर घरातील वातावरण प्रसन्न झाले. या भागात कुटुंबातील सदस्य खूप मजा करताना दिसले. दरम्यान, शोचे दोन स्पर्धकही बेघर झाले.

दोन सदस्य बेघर
यावेळी घरातील सर्व स्पर्धकांना नामांकित करण्यात आले. शो होस्ट करण जोहरने सांगितले की, यावेळी एक नाही तर दोन सदस्य घराबाहेर जाणार आहेत. यानंतर, करण जोहर जनतेचा निर्णय सांगत म्हणाला की, करण नाथ आणि रिद्धिमा पंडित यांचा प्रवास संपतो. रिद्धिमा गेल्या आठवड्यात सहपालशी झालेल्या भांडणामुळे चर्चेत होती, पण कमी मतांमुळे तिला घराबाहेर पडावे लागले. तर दुसरीकडे, जर स्पर्धक करण नाथबद्दल बोलयचे झाले, तर तो घरात फारसा प्रभाव पाडत नव्हता, कदाचित हे त्याच्या बेघर होण्याचे एक मोठे कारण असू शकते.

घराला पछाडले भूताने
यावेळी ‘संडे का वार’ मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतने शो गाठला आणि स्पर्धकांसोबत खूप मजा केली. राखीने स्टेजवर प्रवेश करताच तिने घराचे वातावरण बदलून टाकले. राखीला पाहून करण जोहर म्हणाला की, ती ओटीटी महाराणी आहे. याआधी, शोच्या निर्मात्यांनी राखीचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये राखी भूत बनून कुटुंबातील सदस्यांना घाबरवत होती. पुन्हा एकदा ‘जुली’ची आत्मा राखीच्या आत येते आणि ती कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमकावताना दिसते.

राखी सावंतची मजा
राखी सावंतने ‘बिग बॉस १४’ मध्ये चॅलेंजर म्हणून प्रवेश केला होता. तिला सर्वोत्कृष्ट मनोरंजन करणारी म्हणून घोषित करण्यात आले. शोचा होस्ट सलमान खानने ही तिचे कौतुक केले. बिग बॉस १२ चे विजेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल गेल्या ‘संडे का वार’ मध्ये आले होते. त्याने करण जोहरसोबत खूप मजा केली आणि कुटुंबातील सदस्यांना टास्क देखील दिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

हे देखील वाचा