Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

अरबाज खानचा चॅट शो ‘पिंच’ सीझन २’मध्ये कियारा आडवाणी यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. अलिकडेच शोचा एक नवीन प्रोमो रिलीझ झाला आहे. ज्यात कियारा ट्रोलर्सच्या तीक्ष्ण कमेंट्सवर तिची प्रतिक्रिया देताना दिसून आली. अरबाजने तिला एक ट्रोलरची प्रतिक्रिया वाचून दाखवली, ज्यात लिहिले आहे की, कियारा अक्षय कुमारसोबत आणखी प्रोजेक्ट करू नये. त्यावर कियारा म्हणते की, लोकांनी या गोष्टी इतक्या गांभीर्याने घेऊ नयेत. त्यांनी आपली सीमा ओलांडू नये.

कियाराने अक्षय कुमारसोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये एक ‘गूड न्यूज’ जो हिट झाला होता, तर दुसरा ‘लक्ष्मी’ जो फ्लॉप झाला. तसेच एका युजरने तिला ‘घमंडी’ म्हटले आहे. यावर कियारा म्हणते की, “लोक कधीकधी असे वाचतात, जसे की आम्ही भूमिका करण्यास नकार दिला आहे किंवा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. मग ते त्याचे निष्कर्ष काढू लागतात की, आम्ही घमंडी आहोत. हे असे नाही यार, त्यामागे काही तरी कारण असेलच ना?” (Actress Kiara Advani gave a blunt answer to the critics, she said)

कियारा सध्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. तिने या चित्रपटात डिंपल चीमाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट दिवंगत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. डिंपल चीमा विक्रम बत्राची मैत्रीण होती. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण कॅप्टन बत्रा कारगिल युद्धात शहीद झाले आणि परतले नाहीत. त्यांच्या आठवणीत डिंपलने कोणाशीही लग्न केले नाही आणि आजही त्या एकट्याच त्यांची विधवा म्हणून जीवन जगत आहेत. या भूमिकेसाठी कियारा आडवाणीचे खूप कौतुक होत आहे.

त्याचबरोबर या चित्रपटाचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने देखील उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. त्याचे ही यासाठी खूप कौतुक केले जात आहे. तर हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा