बॉलिवूडमध्ये ‘धक धक गर्ल’ या नावाने लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी ही ५४ वर्षाची आहे. पण तिच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे लाखो दीवाने आहेत. माधुरी ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आहे. पण या गोष्टीचा तिच्या चाहत्यांच्या यादीत काडीमात्र फरक पडला नाही. उलट दिवसेंदिवस ही यादी वाढतचं चालली आहे. तसेच तिच्या सौंदर्याचा निखार देखील वाढत्या वयासोबत वाढतच चालला आहे. अशातच चाहत्यांना घायाळ करणारे माधुरीचे काही फोटो समोर आले आहेत.
माधुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, माधुरीने निळ्या रंगाचा फ्रिल टॉप आणि निळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. तसेच तिने या ड्रेसवर मॅचिंग असे निळ्या रंगाचे कानातले घातले आहेत. तसेच हातात एक डायमंडचे ब्रेसलेट घातले आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहे. तिने या लूकमधील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओ देखील चाहत्यांना खूप आवडला आहे.
नुकतेच तिचा आणि बिग बॉस फेम शहनाझ गिल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओला सोशल मीडिया युजर्सने जोरदार प्रतिसाद दिला होता. सोशल मीडियावर माधुरीची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती तिच्या चाहत्यांना कधीही नाराज करत नाही. (bollywood actress madhuri dixit’s beautiful photo viral on social media)
माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. सध्या अभिनेत्री ‘डान्स दीवाने ३’ या शोचे परीक्षण करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज