Saturday, January 17, 2026
Home अन्य ‘अनुपमा’ फेम मदालसाने परिधान केला ‘असा’ ड्रेस; सावरण्यासाठी धावले तब्बल ४ लोक

‘अनुपमा’ फेम मदालसाने परिधान केला ‘असा’ ड्रेस; सावरण्यासाठी धावले तब्बल ४ लोक

मनोरंजन सृष्टीत पाहिले तर इथे काम काम करणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या कामापेक्षा अधिक फॅशनमुळे, लुक्समुळे आणि फोटोशूटमुळे अधिक चर्चेत असतात. सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय असणाऱ्या या अभिनेत्रींपैकी सध्या सतत प्रकाशझोतात असलेली अभिनेत्री म्हणजे मदालसा शर्मा. स्टार प्लसच्या सुपरहिट ‘अनुपमा’ या मालिकेत ‘काव्या’ ही व्यक्तिरेखा साकारणारी मदालसा शो सुरु झाल्यापासून सतत या ना त्या कारणामुळे सतत गाजत आहे.

‘अनुपमा’ शोने मदालसाला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेत जरी ती नकारात्मक भूमिका निभावत असली तरी तिची लोकप्रियता आणि फॉलोविंग जबरदस्त आहे. मदालसा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. (anupama fame madalsa sharma photoshoot)

सध्या मदालसा तिच्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मदालसाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट यावरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तिच्या फोटोशूटच्या वेळेचे असून, यात तिने मारून रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला असून, या बोल्ड ड्रेसमध्ये मदालसाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. कोणतीही ज्वेलरी न घालता देखील तिच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता पडत नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिचे फोटोशूट परफेक्ट करण्यासाठी आणि परफेक्ट फोटो येण्यासाठी तिचा ड्रेस सांभाळण्यासाठी अनेक माणसं तिला मदत करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर मदालसाने तिचा सर्व माणसांच्या मदतीमुळे आलेला परफेक्ट फोटो पोस्ट केला आहे.

मदालसाबद्दल जास्त सांगायचे झाले तर ती अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माता दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी असून, ती अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. मदालसाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. मदालसाची अजून एक ओळख म्हणजे ती जेष्ठ अभिनेते सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांची मोठी सून असून, तिने महाक्षय चक्रवर्तीसोबत लग्न केले आहे. मदालसाने ‘अनुपमा’ ही मालिका देखील मिथुनदा यांच्या सांगण्यावरूनच करायचे ठरवले. तिचा हा निर्णय योग्य ठरला आणि मदालसाला प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

हे देखील वाचा