चित्रपटांमध्ये सहाय्यक आणि विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांवर आपली छाप सोडणारा अभिनेता म्हणजे अपारशक्ती खुराणा. अपारशक्तीने त्याच्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. अभिनेता आयुष्मान खुराणाचा भाऊ असलेल्या अपारशक्तीने खूप कमी काळात प्रचंड फॅन फॉलोविंग तयार केले आहे.
सध्या अपारशक्ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच आनंदात आहे. लवकरच अपारशक्ती बाबा होणार आहे. अपारशक्तीने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याचा आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना अपारशक्तीने लिहिले, “बर ऐकणं!! कुक्कु आई लव यू ##बेबीशॉवरवीडियो #4DaysToGo #ExcitedMuch’ (Aparshakti khurana share wife baby shower video)
अपारशक्तीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण खुराणा कुटुंब दिसत असून, आयुष्मान खुराणा त्याची पत्नी ताहिरा कश्यप त्यांचे मुलं सोबतच अनेक नातेवाईक दिसत आहे. हे सर्व अपारशक्ती आणि आकृतीला त्यांच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देत आहे. लवकरच येणाऱ्या बाळाचा अपारशक्ती आणि आकृतीच्या चेहऱ्यावर त्यांचा आनंद स्पष्ट दिसत आहे.
अपारशक्ती आणि आकृती यांची पहिली भेट चंदीगढमध्ये एका डान्स क्लासच्या दरम्यान झाली. ते सुरुवातीला खूपच चांगले मित्र झाले आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही एकमेकांना मिळेल तसा वेळ देतात. आकृती ‘फेरीया इव्हेंट्स’ नावाच्या कंपनीची फाउंडर आहे.
अपारशक्ती लवकरच ‘हेल्मेट’ नावाच्या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अपारशक्तीसाठी हा सिनेमा खूपच खास आहे. कारण पहिल्यांदा तो मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत प्रनूतन बहल मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा एक रोमॅंटिक सिनेमा असून यातून एक सोशल मेसेज देखील मिळणार आहे.
अपारशक्तीने ‘दंगल’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘पति पत्नी और वो’ आदी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम
-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी