केआरके म्हणजे कमाल आर खान, जो ट्विटरमार्फत सतत काही ना काही वक्तव्य केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. कमाल खान हा कलाकारांवर सतत निशाणा साधतो. त्यामुळे तो सतत वादाच्या कचाट्यात सापडतो. बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयींनी मंगळवारी (२४ ऑगस्ट) इंदूर येथील न्यायालयात कमाल आर खान उर्फ केआरकेच्या विरोधात बदनामीची तक्रार दाखल केली आहे. त्यात केआरकेने मनोज यांच्याविरोधात अपमानास्पद ट्वीट केल्याचा आरोप आहे. या आरोपाविषयी मनोज यांचे वकील परेश जोशी यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली.
जोशी म्हणाले की, केआरकेच्या अपमानास्पद ट्विटबाबत मनोज वाजपेयी यांच्या वतीने न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) कडे तक्रार सादर करण्यात आली. यामध्ये कलम ५०० अंतर्गत केआरकेविरोधात बदनामीचा फौजदारी खटला दाखल करण्याची विनंती करण्यात आली आहे. २६ जुलै रोजी केआरकेने मनोजबद्दल अपमानास्पद ट्वीट केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे अभिनेते मनोज वाजपेयींची प्रतिमा खराब झाली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. केआरकेने यापूर्वीही अनेक कलाकारांविरोधात बिनधास्त वक्तव्य केले आहे आणि कायदेशीर कारवाईलाही त्याला अनेकदा सामोरे जावे लागले आहे. आता मनोज वाजपेयींनी केआरकेविरोधात बदनामीची तक्रार दाखल केली आहे. एक वाद जिथे संपतो, तिथेच दुसरा उभा राहत आहे. केआरके स्वतःच स्वतःसाठी वाद निर्माण केलेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
केआरके अनेकदा प्रकाशझोतात येतो, पण जेव्हापासून केआरकेने सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाबद्दल वक्तव्य केले, तेव्हापासून तो सतत चर्चेत आला आहे. तो दररोज नवा वाद निर्माण करत आहे. सलमान खानला पाठिंबा दिल्याने त्याने गायक मिका सिंगवरही केआरकेने हल्ला केला होता. त्यानंतर केआरकेने कंगना रणौतवर निशाणा साधला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ
-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर
-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर