Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड धरम पाजींची लेक ईशा देओलने चित्रपटाच्या सेटवरच वाजवली होती अमृता रावच्या कानाखाली, पण का?

धरम पाजींची लेक ईशा देओलने चित्रपटाच्या सेटवरच वाजवली होती अमृता रावच्या कानाखाली, पण का?

अनेकदा आपण पाहतो की, घरामध्ये एकत्र काम करत असतानाही नातेवाईकांमध्ये वाद होतात. असेच काहीसे बाॅलिवूडमध्येही घडते. छोट्या- मोठ्या कारणांमुळे अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून येतात. बाॅलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत की, ते एकमेकांना सोबत काम करणे तर सोडाच, जवळ- जवळ उभे सुद्धा राहत नाहीत. त्यांची चित्रपटात एकमेकांसोबत काम करण्याची इच्छाही नसते. तसेच ते एकमेकांना कमी लेखतात, दुर्लक्ष करतात आणि यामुळेच कधी कधी खूप वाईट परिस्थिती येते. असेच काहीसे एकदा ‘प्यारे मोहन’ चित्रपटाच्या सेटवर ईशा देओल आणि अमृता राव यांच्यात घडले होते.

‘प्यारे मोहन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, सेटवर धरम पाजी म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आणि अमृता राव यांच्यात वाद झाले होते. ईशा इतकी चिडली होती की, तिने अमृतावर हात उचलण्यास मागेपुढे पाहिले नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, चित्रपटाच्या सेटवर अमृताने ईशावर एक अश्लील कमेंट्स केली होती, ज्यामुळे ईशा तिला पाहून चकित झाली आणि तिच्या कानाखाली मारली. ही गोष्ट २००६ सालची आहे.

सन २००६ मध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ईशा देओलने कबूल केले की, “होय, मी अमृताला कानाखाली मारली होती. एक दिवस तिने दिग्दर्शक इंद्र कुमार आणि कॅमेरामनसमोर शिवीगाळ केली होती. अशाप्रकारचा अपमान मला सहन झाला नाही, म्हणून मी तिला कानाखाली मारली. मला याबद्दल कोणतीही खंत नाही. कारण तिने तसेच कृत्य केले होते. मी हे फक्त माझा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी केले.”

मात्र, एक चांगली गोष्ट म्हणजे अमृता रावलाही आपली चूक लवकरच कळली आणि तिने ईशा देओलची माफी मागितली. ईशाने सांगितले होते की, “तिने काय केले हे तिला समजले मग तिने माझी माफी मागितली आणि मी तिला माफही केले. आता आमच्यामध्ये सर्व काही ठीक आहे.”

अमृता रावनेही एका मुलाखतीत सांगितले होते की, “तिला दोष देणे योग्य नाही, पण मला त्याबद्दल काहीही बोलायचे नाही. हे माझ्यासाठी खूप जवळचे प्रकरणाप्रमाणेच आहे.”

सन २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्यारे मोहन’ हा चित्रपट इंद्र कुमार आणि कुकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात ईशा देओल आणि अमृता रावसोबत विवेक ओबेरॉय आणि फरदीन खान यांनी काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा