Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘स्वॅग आहे का आग आहे!’ सिद्धूच्या स्टायलिश फोटोवर ‘या’ अभिनेत्याची कमेंट ठरतेय लक्षवेधी

सिनेसृष्टीत ‘सिद्धू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ जाधवला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याची एक वेगळीच स्टाईल आणि अंदाज आहे, ज्यामुळे आज त्याचे लाखो चाहते आहेत. एक नम्र पार्श्वभूमी आणि सावळे पण भोळे रूप घेऊन, सिद्धार्थने चित्रपटसृष्टीत अथक परिश्रम, उत्कटतेने त्याचा मार्ग स्वतः कोरला. अभिनयाप्रमाणेच तो सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. तसेच सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असतो.

नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमुळे सिद्धार्थ खूपच चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये सिद्धार्थचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने पिवळ्या आणि काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे आणि त्यावर काळी जीन्स घातली आहे. लेदर जॅकेट, ब्राऊन शूज आणि त्यावर गॉगल एकंदरीत असा स्टायलिश लूक करून, सिद्धार्थ भलताच चर्चेत आला आहे.

हे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कमेंट्सच्या माध्यमातून चाहते अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत. चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही यावर कमेंट्स केल्या आहेत. तेजस्विनी पंडितने ‘माईन’ म्हटले आहे, तर अमेय वाघ म्हणतोय, ‘स्वॅग आहे का आग आहे!’.

सिध्दार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली. नंतर त्याने ‘अगं बाई अरेच्चा’द्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. पुढे ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुइया’, ‘टाइम प्लीज’, ‘धुरळा’ इत्यादी चित्रपटातील त्याच्या अभिनयाने त्याला प्रत्येक मराठी घरात पोहचवले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा