Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड अफलातून! सोनू सूदचा थेट एस्कलेटरवरच स्टंट; पण चाहत्यांना केली ‘ही’ विनंती

अफलातून! सोनू सूदचा थेट एस्कलेटरवरच स्टंट; पण चाहत्यांना केली ‘ही’ विनंती

चित्रपटांमध्ये अनेकदा नकारात्मक, खलनायकी भूमिका करणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात देवदूत म्हणून समोर आला आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मनात असणारा आदर, सन्मान अधिकच वाढला. कोरोना महामारीच्या काळात सोनू सूदने जे काही कार्य केले किंबहुना आजही करत आहे, त्यासाठी त्याला आयुष्यभर धन्यवाद म्हटले तरी कमीच राहील. आज सोनू सर्वांसाठी रियल लाइफमधला हिरो म्हणून ओळखला जातो.

हाच सोनू त्याच्या आयुष्यात खूपच कुल डूड आहे. नेहमी त्याच्या कार्यामुळे बातम्यांमध्ये येणार सोनू आज त्याच्या हटके व्हिडिओमध्ये चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू की स्टंट करताना दिसत आहे. सोनू एका मॉलमध्ये दिसत असून, तो मॉलमधल्या एस्कलेटरच्या रेलिंगला पकडून, पाय वर घेऊन हवेत उडताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करताना लोकांना असे काहीही न करण्याचे अपील केले आहे. त्याने लिहिले, ‘जर मी हवेत उडू शकलो तर..मात्र तुम्ही असे काहीही करू नका.” या व्हिडिओमध्ये सोनू काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि काळ्या रंगाच्या मास्कमध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यावर फॅन्सच्या भारी भारी कमेंट्स येत आहे. (sonu sood doing stunt on accelerator)

सोनू सूदने त्याच्या कार्यासाठी जास्त ओळखला जात आहे. त्याने त्याच्या समाजकार्याने संपूर्ण जगात एका अभिनेत्याव्यतिरिक्त त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज सोनू सूदला संपूर्ण देशातून अनेक लोकं जसे जमेल तसे त्याला भेटायला येत त्याला धन्यवाद म्हणत आहे. सोनुने आणि त्याच्या टीमने कोरोनाच्या काळात लोकांना पाहिजे ती आणि शक्य तेवढी मदत केली. त्याच्या या मदतीने अनेकांचे प्राण वाचले. आज सोनू कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासोबतच इतर अनेक कार्यांमध्ये तो लोकांना मदत करत आहेत.

नुकतेच सोनुने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जाहीर केले की, तो काही स्ट्रीममध्ये मोफत पदवीचे कोर्सेस सुरु करणार आहे. त्यामुळे कोरोनाकाळात लोकांवर आलेल्या संकटांमुळे मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही. मुलांचे भविष्य उज्वल आणि देशाचे नाव मोठे करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुरुष कलाकारांना जास्त फी मिळण्यावर बोलल्या नीना गुप्ता; म्हणाल्या, ‘पुरुषांच्या या जगात स्त्रियांना…’

-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

हे देखील वाचा