Monday, February 24, 2025
Home अन्य केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

‘कौन बनेगा करोडपती’ या शोने आजवर अनेकांना लखपती आणि करोडपती बनवले आहे. आपल्या चतुर बुद्धीच्या जोरावर इथे येणारे स्पर्धक भारी भक्कम रक्कम घेऊनच जातात. या शोमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला करोडपती बनायचे आहे, याच भावनेने आणि विचाराने येत असते. प्रत्येक स्पर्धकाला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडून द्यायची असतात.

गुरुवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या एपिसोडमध्ये मध्यप्रदेशच्या पोलीस अधिकारी निमिषा अहिरराव सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पूर्ण स्पर्धा उत्तमपणे खेळली. आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत, त्या लखपती झाल्या. त्यांनी तब्बल ३ लाख २० हजार रुपये जिंकले आणि घरी परतल्या. त्यानंतर आशीष सुर्वणा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडमध्ये  जिंकून हॉट सीट पर्यंत पोहचले. (kbc 13 contestant ashish suvarna couldn t answer this rs 12 5 lakh question)

आशिष या शोमध्ये त्यांच्या आईबरोबर आले होते. त्यांच्या आईने त्यांचे यावेळी खूप कौतुक केले. त्यांच्या आई म्हणाल्या “आशिष लहानपणापासूनच अभ्यासू आणि मेहनती आहे, तसेच आपले घर देखील तो व्यवस्थित सांभाळतो”. आशिष यांनी हा शो खेळत ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. तर त्यांनी एका खास प्रश्वावर क्विट करत हा शो सोडला.

तो प्रश्न होता, कोणत्या जोडीने सिनेसृष्टीमध्ये आपल्या संगीताची सुरुवात भोजपुरी ‘दंगल’मधून केली होती, ज्यामध्ये ‘काशी हिले पाटणा हिले’ अशी गाणी होती?

अ . नदीम -श्रवण
ब . आनंद मिलिंद
क. लक्ष्मीकांत–प्यारेलाल
ड. साजिद–वाजिद

या प्रश्नाचे अचूक उत्तर नदीम-श्रवण हे होते.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर योग्य ती खबरदारी घेत ‘केबीसी’ सुरु आहे. यामध्ये सर्व स्पर्धकांना ३ दिवस आधीच बोलावले जाते आणि त्यांना एका हॉटेल मध्ये तीन दिवस ठेवले जाते. त्यानंतर चौथ्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर ही चाचणी केली जाते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना शोमध्ये घेतले जाते.

स्पर्धकांनी कोणती कपडे घालायची हे ‘केबीसी’ ठरवणार
‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये खेळत असताना प्रत्येक स्पर्धकाला १० जोडी कपडे बरोबर घेऊन येण्यास सांगितले जाते. सफेद किंवा काळी कपडे घालून स्पर्धा खेळायला मनाई आहे. कोणत्या रंगाचे कपडे घालायचो हे ‘केबीसी’ची टीम ठरवते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिनेसृष्टीतील ‘या’ तीन प्रसिद्ध नावांची महापौरपदासाठी शिफारस; तर सोनू सूद आज घेणार मुख्यमंत्री केजरीवालांची भेट

-खतरों के खिलाडी: उडालीय सर्वांचीच झोप, नेमकं कशाला घाबरलेत शोचे हे निडर स्पर्धक

-नुसरत जहाँ आई झाल्यानंतर, तिच्यापासून विभक्त झालेल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमच्यात…’

हे देखील वाचा