Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड सलमान खानला विमानतळावर रोखणाऱ्या सीआयएसएफ जवानावर भडकली राखी सावंत; म्हणाली, ‘सलमानचा चेहराच…’

सलमान खानला विमानतळावर रोखणाऱ्या सीआयएसएफ जवानावर भडकली राखी सावंत; म्हणाली, ‘सलमानचा चेहराच…’

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे, मुंबई विमानतळावर त्याला सीआयएसएफ जवानाने रोखले होते. आता या प्रकरणामध्ये राखी सावंतने उडी घेत त्या जवानावर आगपाखड केली आहे. राखीने केलेले वक्तव्य सध्या माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे.

राखीने म्हटले आहे की, “सलमान खानचा चेहराच ओळख आहे. मग त्याला रोखण्याची गरज काय होती?” यासोबतच सलमानला विमानतळावर रोखल्यामुळे तिला दु:ख झाल्याचे म्हटले आहे. (Rakhi Sawant Scolded The CISF Jawan Who Stopped Salman Khan At The Airport)

राखीने म्हटले की, “सीआयएसएफ जवानाने हे जाणूनबुजून प्रसिद्ध होण्यासाठी केले आहे. सलमान खान बॉलिवूडचा लिजंड आहे. त्याला कोण ओळखत नाही?” पुढे बोलताना तिने म्हटले की, “सीआयएसएफ जवानाने माध्यमांमध्ये आपला फोटो येण्यासाठी सलमानला विमानतळावर रोखले होते.”

राखीबाबत बोलायचं झालं, तर ती अशी अभिनेत्री आहे, जी दरदिवशी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यापूर्वी तिने म्हटले होते की, जर तिला कुत्र्याने चावले, तर ती त्यालाही चावेल. यानंतर आता राखीने साआयएसएफ जवान सोमनाथ मोहंतीवर निशाणा साधला आहे आणि सलमानला तपासणीसाठी विमानतळावर रोखणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण?
नुकतेच ‘दबंग’ खान म्हणजेच सलमानला मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी रोखण्यात आले होते. ‘टायगर ३’ च्या शूटिंगसाठी रूसला जात असताना सलमान खानला रोखण्यात आले होते. सलमानला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

तरीही, सीआयएसएफचे असे म्हटले आहे की, सलमान खानला मुंबई विमानतळावर रोखणे ही नियमित तपासणी होती. मुंबईच नाही, तर देशातील सर्व विमानतळावर सीआयएसएफ जवान सामान्य नागरिकांसोबतच प्रसिद्ध कलाकारांना तपासणीसाठी रोखतात.

सलमान खानबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. यासोबतच सिद्धार्थ जाधव आणि प्रवीण तरडे या मराठी कलाकारांनीही या चित्रपटात भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा

 

हे देखील वाचा