बॉलिवूडमध्ये अभिनेते आणि अभिनेत्री चित्रपटांत एकत्र काम करत असताना एकमेकांकडे आकर्षित होतात. खूप कमी कलाकार आपले आयुष्य एकाच जोडीदाराबरोबर घालवतात. काही कलाकारांचे २ पेक्षाही जास्त विवाह झालेले असतात. विचार जुळलेले नाही अथवा मतभेद वाढले की, कलाकार घटस्फोट घेतात. त्यातीलच एक अभिनेता फरहान अख्तर होय.
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाद्वारे फरहानने लाखो चाहते कमावले. त्याच्या या चित्रपटातून त्याला भरपूर पसंती मिळाली. सध्या तो त्याच्या प्रेयसीमुळे जास्त चर्चेत आहे. फरहानने सोशल मीडियावर त्याची प्रेयसी शिबानी दांडेकरसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. ती शुक्रवारी (२७ ऑगस्ट) आपला ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तच फरहानने त्यांचा हा खास फोटो शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दिली आहे. अभिनेता ऋतिक रोशनने देखील या फोटोवर कमेंट करत शिबानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (bollywood farhan akhtar wishes girlfriend shibani dandekar a romantic birthday)
फरहानचे अधूना भवानीसोबत पहिले लग्न झाले होते. साल २०१६ मध्ये दोघांनी एकमेकांपासून वेगळे व्हायचे ठरवले आणि घटस्फोट घेतला. त्यानंतर फरहान शिबानीकडे आकर्षित झाला. ती एक मोठी हेअर स्टायलिस्ट आहे. फरहानने तिच्या वाढदिवसानिमित्त दोघांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे मालदीवला फिरायला गेले होते. तेथे शिबानीसोबत घालवलेला वेळही त्याने फोटोंच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांमध्ये शेअर केला होता.
फरहानच्या चित्रपटातील कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, तो एक उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता तसेच पार्श्वगायक देखील आहे. साल २००१ मध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. त्यांनतर २००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून त्याने अभिनय साकारला. त्याच्या दमदार अभिनयाने तो चाहत्यांची मने जिंकत असतो आणि आता त्याच्या प्रेयसीमुळे देखील चांगलाच चर्चेत असतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’
-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’