Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘पप्पी दे पप्पी दे पारुला’, म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या स्मिताचा ग्लॅमरस लूक आला समोर

‘पप्पी दे पप्पी दे पारुला’ असे म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये स्मिताने काम केले पण ‘बिग बॉस मराठी’ने तिला खरी ओळख मिळाली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये ती तिसरी रनरअप ठरली होती. या शोमध्ये तिचा स्वभाव, टास्क खेळण्याची शक्कल, तिचा ग्लॅमर आणि डान्स सगळ्यांनीच पाहिला आहे. स्मिता ही अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

स्मिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा ग्लॅमरस ड्रेस घातला आहे. यासोबत तिने हातात अत्यंत सुंदर लाल रंगाची पर्स घेतली आहे. यासोबत तिने कानात इअरिंग घातले आहेत. तसेच हातात बऱ्याच अंगठ्या घातलेल्या आहेत. या लूकमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. (Marathi actress smita gondkar’s glamorous look viral on social media)

स्मिताचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने “हाय मेरी परम सुंदरी,” अशी कमेंट केली आहे. तसेच दुसऱ्या एका चाहत्याने “सुंदर अप्रतिम,” अशी कमेंट केली आहे. या व्हिडिओवर सातत्याने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तिचे अनेक चाहते तिच्या या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

https://www.instagram.com/p/CTB1E_ugEeD/?utm_medium=copy_link

स्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘वॉन्टेड बायको’, ‘येरे येरे पैसा २’, ‘जस्ट गंमत’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘गडबड गोंधळ’, ‘माणूस एक माती’, ‘तो आणि मी’, ‘अशी फसली नानाची टांग’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. यासोबत तिने झी मराठीवरील ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. यामध्ये सुशांत शेलार, जयवंत वाडकर, किशोर कदम, संजय जाधव यांसारखे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत

-‘या’ क्लोथिंग ब्रँडचा मालक आहे करणवीर बोहरा; वडील अन् आजोबांचेही होते चित्रपटांशी नाते

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

हे देखील वाचा