बिग बॉसच्या १४ व्या सिझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. हा सिझन हिट करण्यासाठी यावेळी शोमध्ये गतवर्षीच्या ३ स्पर्धकांचा समावेश करण्यात आला आहे. ते ३ स्पर्धक म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान होय. हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात सीनियर बनून इतर सदस्यांवर दबदबा ठेवत आहेत. या शोमध्ये सिद्धार्थ चांगला प्रसिद्ध झाला आहे. त्याने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.
तो म्हणाला की, तो मुलींना इंप्रेस करण्यासाठी आपल्या वडिलांच्या खिशातून पैसे चोरी करत असायचा.
एका क्लिपमध्ये सिद्धार्थ सांगत आहे की, “वडिलांचा खिसा नेहमीच पैशांनी भरलेला असायचा. ते आपले पैसे एकदम व्यवस्थित ठेवायचे. आधी ५०० रुपयांच्या नोटा, त्यानंतर १०० आणि ५० च्या. सोबतच शेजारी १०० रुपयांच्या आणखी काही नोटा.”
“मी विचार केला की, इतके पैसे आहेत त्यांना समजणार नाही की कोणते पैसे कुठे आहेत. मला वाटले एकसाइडची बाजू भरलेली असते. त्यांनी मोजून ठेवले नसतील. त्यातून मी दोन-तीन वेळा पैसे काढले. परंतु त्यानंतर पकडलो गेलो,” असेही तो पुढे म्हणाला.
टीआरपीएमध्ये फेल
बिग बॉसच्या घरात इतक्या घडामोडी घडल्यानंतरही चाहते याकडे आकर्षित होत नाहीयेत. टीआरपीच्या यादीत हा शो यावेळी आपले स्थान बनवू शकलेला नाही. त्यामुळे शोचे प्रायोजक चिंतेत पडले आहेत. यामुळे कुठेतरी शोचा होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानवरही प्रभाव पडत आहे.