Sunday, October 26, 2025
Home अन्य बॉन्ड गर्ल कधीही मरत नाही! जिवंत आहे अभिनेत्री ‘तान्या रॉबर्ट्स’, त्या एका अफवेने उडाली खळबळ

बॉन्ड गर्ल कधीही मरत नाही! जिवंत आहे अभिनेत्री ‘तान्या रॉबर्ट्स’, त्या एका अफवेने उडाली खळबळ

जेम्स बॉन्ड चित्रपट ‘A View to a Kill’ ची अभिनेत्री तान्या रॉबर्ट्स हीच मृत्यू झाला असल्याची बातमी मोठ्या प्रमाणावर वायरल झाली होती. आता तान्या जिवंत असल्याची बातमी आली आहे. रविवारी तान्याचा प्रतिनिधी माइक पिंगले याने अनेक मीडिया हाऊसला तान्या गेल्याची बातमी दिली होती. मात्र आता माइकने असे चुकून सांगितले गेल्याचे मान्य केले आहे.

तान्या ख्रिसमसच्या आदल्या दिवशी रात्री तिच्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेली होती. घरी आल्यावर ती अचानक कोसळली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर तान्या मृत झाल्याची बातमी आली होती. मात्र आता हॉस्पिटलकडून तान्या जिवंत असून ती ICU व्हेंटिलेटरवर आहे, आणि तिची तब्येत गंभीर असल्याचे सांगितले आहे.

६५ वर्षीय तान्या सध्या लॉस एंजेलिसच्या सीडर सिनाई हॉस्पिटलमध्ये भरती आहे. पण अजूनही तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाहीये.

तान्याचे खरे नाव विक्टोरिया लीग ब्लम असे आहे. तान्याने तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. शिवाय तिने अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा काम केले. तिने अभिनयाची सुरुवात ‘फोर्स एन्ट्री’ मधून केली. १९८५ साली तान्या जेम्स बॉन्डचा “ए व्यू टू ए किल” या सिनेमात दिसली. तिने डिटेक्टिव शो ‘चार्लीज एंजिल्स’ मध्ये देखील काम केले आहे.

हे देखील वाचा