Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पहाटेच्या ३ वाजता सिद्धार्थ शुक्ला झाला होता अस्वस्थ; आईला मागितले पाणी आणि म्हणाला…

टीव्ही विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे सिद्धार्थ शुक्ला होय. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्यूवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. खूप कमी वेळात सिद्धार्थने मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण केली होती. पण कुणास ठाऊक की, सिद्धार्थ अचानक सर्वांना सोडून का निघून गेला. शेवटच्या वेळात तो कुटुंबियांसोबत आरामात रात्र घालवत होता, मित्रांशी बोलत होता. पुढच्या काही तासांतच काहीतरी अप्रिय घडणार आहे, याची कुणालाही कल्पनाही नव्हती.

माध्यमातील वृत्तानुसार, बुधवारी (१ सप्टेंबर) रात्री जेव्हा सिद्धार्थ शुक्ला घरी आला, तेव्हा तो औषध घेतल्यानंतर झोपी गेला आणि सकाळी उठलाच नाही. पण रात्रीपासून सकाळपर्यंतचा काळ सिद्धार्थसाठी खूप वेदनादायक आणि अस्वस्थतेत गेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला सकाळी ३:३० च्या दरम्यान अचानक जाग आली. आणि त्यावेळी त्याला खूप अस्वस्थ वाटत होते. त्याने आईला छातीत वेदना झाल्याचे आणि अस्वस्थतेबद्दल सांगितले. मग त्याने त्याच्या आईकडे पाणी मागितले आणि पाणी पिऊन आरामात झोपला.

पण जेव्हा सिद्धार्थ सकाळी उठला नाही, तेव्हा आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. आई पुन्हा पुन्हा ओरडत राहिली, पण सिद्धार्थने काहीच प्रतिसाद दिला नाही. यानंतर सिद्धार्थच्या आईने मुलीला बोलावले. त्यानंतर मुलीने डॉक्टरांना घरी बोलावले. घरी आल्यावर डॉक्टरांनी सिद्धार्थची तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले. यानंतर सिद्धार्थला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आईसह संपूर्ण कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. तो त्याच्या आईच्या खूप जवळ होता. कित्येक वर्षांपूर्वी वडिलांच्या मृत्यूनंतर, आईनेच त्याला आणि दोन्ही मुलींना वाढवले. सिद्धार्थच्या मृत्यूने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. सिद्धार्थ शुक्लाच्या घरी सेलिब्रिटी आणि चाहते भेट देण्यासाठी जात आहेत. आसीम रियाझपासून शेफाली जरीवालापर्यंत आणि आरती सिंग तसेच सर्वजण त्याच्या घरी पोहोचले आहेत. त्याचबरोबर सिद्धार्थची खास मैत्रीण शहनाज गिलचीही अवस्था वाईट आहे, तसेच ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा