‘मम्मीची एक फाईट आणि वातावरण टाईट’ हा डायलॉग आठवतोय ना? आठवणारच! २०१९ मधील ‘गर्ल्स’ चित्रपटातील या डायलॉगने सर्वांना वेड लावले होते. यासोबत वेड लावले या चित्रपटातील मती, मॅगी आणि रुमीने. यातील बिनधास्त, बेधडक आणि वेळ आल्यावर डायरेक्ट हातापायीवर येणारी रुमी म्हणजे अन्विता फलटणकर होय. याच चित्रपटातून एक गुबगुबीत, क्यूट अभिनेत्री सर्वांसमोर आली. इथूनच अन्विताच्या करिअरचा खरा प्रवास सुरू झाला. अन्विता सध्या झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची स्वीटू नावाची भूमिका चांगलीच गाजत आहे. अन्विता सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
अन्विताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तिच्यासोबत तिचा मित्र आणि अभिनेता आशय कुलकर्णी दिसत आहे. त्या दोघांनी अत्यंत मजेशीर व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांनीही डोळ्यावर चष्मा लावलेला दिसत आहे. ते दोघेही मस्ती करताना दिसत आहेत.
अन्विताने हा व्हिडिओ शेअर करून “घुमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गायेंगे, ऐश करेंगे और क्या?” असे कॅप्शन दिले आहे. त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्यांच्या या मजेशीर व्हिडिओला ५४ हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. (anvita phaltankar and ashay kulkarni’s funny video viral on social media)
अन्विताने या आधी ‘शाळा’ आणि ‘टाईमपास’ या चित्रपटात काम केले आहे, पण तिला खरी ओळख ‘येऊ कशी मी नांदायला’ या मालिकेने मिळाली आहे. या मालिकेत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत शाल्व किंजवडेकर दिसत आहे. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे, तर आशय कुलकर्णी याने झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले. या दोन्ही मालिकेमधील त्याच्या पात्राला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या या दोन्ही मालिकांना आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…










