Monday, October 27, 2025
Home मराठी सोनालीच्या साडीमधील स्टायलिश लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, चाहता म्हणाला, ‘तुम्हाला कधीही बघावं, पहिल्यापेक्षा…’

सोनालीच्या साडीमधील स्टायलिश लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, चाहता म्हणाला, ‘तुम्हाला कधीही बघावं, पहिल्यापेक्षा…’

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना सोशल मीडियावर शेअर करत असते. मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर तिचा वावर चांगलाच वाढला आहे. सातत्याने ती तिचे फोटो शेअर करत असते. ती आजकाल तिचे स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये खरं तर तिने साडी नेसली आहे, पण तिने अत्यंत वेगळ्या पद्धतीने ही साडी नेसली आहे. तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच त्यावर फिकट गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच कमरेला सोनेरी रंगाचा बेल्ट लावला आहे. तिने सगळे केस मागे बांधले आहे. तसेच यावर अत्यंत सुंदर असे कानातले घातले आहेत. (Marathi actress sonalee Kulkarni’s stylish saree look photos viral on social media)

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया देऊन तिचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुम्हाला कधीही बघावं, पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसता.” तसेच अनेकजण या फोटोवर हार्ट ईमोजी तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या कारकिर्दीत ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुराळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिवसेंदिवस तू सुंदर दिसत आहेस’, तेजश्री प्रधानच्या सुंदर फोटोवर चाहता घायाळ

-सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला पोहचली संभावना, ‘या’ कारणामुळे पोलिसांनी लगावली तिच्या पतीच्या कानशिलात

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

हे देखील वाचा