Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सिद्धार्थच्या आईला अगोदरच अंदाज होता, म्हणून जास्त रडल्याही नाहीत’, ‘या’ अभिनेत्याने केलं खळबळजनक वक्तव्य

टीव्ही इंडस्ट्रीतील एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून सिद्धार्थ शुक्लाला ओळखले जात होते. गुरुवारी सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले आहे. त्याच्या जाण्याने त्याच्या परिवारासह जवळच्या मित्रांनाही धक्का बसला आहे. पण याच दरम्यान, आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कमाल आर खान (KRK)ने सिद्धार्थ शुक्लाबाबत एक मोठे विधान केले आहे. त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने असे अनेक खुलासे केले आहेत, जे खरोखर आश्चर्यचकित करणारे आहेत.

‘सिद्धार्थच्या आईला होती माहिती’
केआरकेने व्हिडिओमध्ये सांगितले की, “त्याच्या अनेक मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना शेवटच्या क्षणी सिद्धार्थ शुक्लाचा चेहरा बघायचा होता. पण त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणालाही त्याचा चेहरा पाहू दिला नाही. सिद्धार्थ शुक्लाची आई आपल्या मुलाच्या मृत्यूवर जास्त रडली नाही. कारण तिला कुठेतरी अगोदरच माहित होते की हे होणार आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या आई खूप आध्यात्मिक आहेत.” (actor and producer krk big statement over sidharth shukla death and his mother)

‘नाही दाखवला सिद्धार्थचा चेहरा’
केआरकेने सांगितले की, “जेव्हा सिद्धार्थचा मृतदेह हॉस्पिटलमधून घर आणि स्मशानभूमीत नेण्यात आला. तेव्हा त्याचा चेहरा कोणालाही दाखवला गेला नाही. त्याच्या बिग बॉसमधील मित्राने खूप विनंती केली होती की, आम्हाला एकदा सिद्धार्थचा चेहरा पाहू द्या. पण कुटुंबातील सदस्यांनी नकार दिला आणि सांगितले की नाही, आम्ही सिद्धार्थला पाहू शकत नाही. निमित्त साधत सांगण्यात आले की, कोणीपण सिद्धार्थ शुक्लाच्या चेहऱ्याचा फोटो काढेल.”

‘काळा-पिवळा किंवा निळा झाला असावा चेहरा’
केआरके पुढे म्हणतो की, “मी याची हमी देत ​​नाही, परंतु काही लोकांचा असा विश्वास आहे की, कदाचित सिद्धार्थ शुक्लाचा चेहरा काळा, फिकट लाल, निळा झाला आहे. म्हणूनच त्याचा चेहरा दाखवला जात नाही.” या व्हिडिओच्या शेवटी, केआरके म्हणाला की, “हे बरोबर आहे की चुकीचं हे मला माहित नाही, कारण मी तिथे नव्हतो. पण मला असेही वाटते की, कदाचित असेच काही कारण असावे, अन्यथा चेहरा न दाखवण्याचे काही कारण नाही.”

केआरकेच्या या वक्तव्यामुळे सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूला वेगळे वळण मिळाले आहे. आता या गोष्टीत किती तथ्य आहे, हे लवकरच सर्वांसमोर येईल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा