मराठी टेलिव्हिजनवरील ‘होणार सून मी घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर आणि सोज्वळ अशी अभिनेत्री आली होती. तिच्या अभिनयाची जादू एवढी आहे की, अजूनही त्या मालिकेतील तिचा अभिनय कोणताही प्रेक्षक विसरू शकला नाही. तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान होय. तेजश्रीने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
तेजश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एका ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने चेंक्सचा एक शॉर्ट ड्रेस परिधान केला असून, त्यावर तिने पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत गोड हसत पोझ देत आहे. (Marathi actress tejshri pradhan share her cute photo on social media)
तेजश्रीने हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “क्या “स्वाद है, जिंदगी मैं.” यासोबत तिने लिहिले आहे की, “तुम्हाला ती जुनी डेअरी मिल्कची जाहिरात आठवते का? ज्यात ती मुलगी डान्स करत धावत स्टेडियममध्ये शिरते तिचे जिंकणे सेलिब्रेट करायला आणि मग सगळे कॅमेरा तिच्यावर येतात तसेच काहीसे वाटले मला हा फोटो काढताना. लहानपणापासून मला एकदा तरी तिच्यासारखे करायचे होते. फक्त मी पुण्याच्या रस्त्यावर केले जे फार कोणी पहिले नाही आणि कोणी दखल सुद्धा घेतली नाही. पण त्यात काय मी तर फार एन्जॉय केलं.” तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.
तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…