Saturday, April 19, 2025
Home मराठी परी म्हणू की सुंदरा! गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये वीणाने छेडल्या प्रेक्षकांच्या हृदयाच्या तारा, पहा तिचे फोटो

परी म्हणू की सुंदरा! गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये वीणाने छेडल्या प्रेक्षकांच्या हृदयाच्या तारा, पहा तिचे फोटो

मराठी बिग बॉसचं दुसरं पर्व चांगलंच गाजलं होतं. यासोबत घरातील अनेक स्पर्धक चर्चेत आले होते. यातील एक स्पर्धक म्हणजे वीणा जगताप होय. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वामधून वीणा चांगलीच नावारूपाला आली होती. वीणा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. अशातच वीणाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची भरभरून पसंती मिळत आहे.

वीणाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा एक सुंदर लेहंगा घातलेला आहे. या ड्रेसला मॅचिंग असा नेकलेस आणि कानातले घातले आहे. तसेच तिच्या हातावर मेहेंदी देखील काढलेली दिसत आहे. तसेच तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिचे चाहते या फोटोवर कमेंट करून कौतुकाचे पूल बांधत आहेत. काहींना तिचा ड्रेस आवडला आहे तर काहींना तिचा संपूर्ण लूकच खूप आवडला आहे. (Bigg Boss fame veena jagtap’s photo viral on social media)

वीणा बिग बॉसच्या घरात असताना तिचे आणि शिव ठाकरेचे अफेअर खूप गाजले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर देखील ते अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले होते. ते सोशल मीडियावर देखील एकमेकांचे फोटो शेअर करत होते, पण मागील अनेक दिवसांपासून एकमेकांचे फोटो शेअर करत नाही. तसेच त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या पसरत आहेत.

वीणाने ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत काम केले आहे. यासोबत तिने ‘अनन’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा