Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

चाहत्यांची प्रतिक्षा संपली, लॉकडाऊन नंतर सपनाचं नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

हरियाणवी डान्स क्वीन सपना चौधरी नेहमीच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते. चाहत्यांना तिची नृत्यशैली खूप आवडते. सपना ही स्टेज शोज सुद्धा करत असते. मात्र करोना काळामध्ये तिचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते. याच दरम्यान ती गरोदर देखील होती. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतरही तिचे कार्यक्रम होऊ शकले नाही. यामुळे सपनाच्या जुन्याच व्हिडीओवर चाहत्यांना समाधाना मानावे लागत होते. परंतु त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे आणि त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की नुकतंच सपना चौधरीचं ‘चटक मटक’ हे नवीन हरियाणवी गाणं युट्युबवर रिलीज झालं आहे. या गाण्याने युट्युबवर एकच धमाल उडवून दिली असून सपना चौधरीचं हे गाणं तिच्या चाहत्यांमध्ये चांगलंच गाजतंय. या गाण्यात सपना हरियाणवी रंगात दिसली असून तिची स्टाईलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

या गाण्यात सपना चौधरी हरियाणवी पेहरावात दिसली आहे. हे गाणं पूर्णपणे हरियाणवी शैलीचं आहे. हे गाणं १९ डिसेंबर रोजी यूट्यूबवर रिलीज झालं असून आतापर्यंत या व्हिडिओला कोटींमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला यूट्यूबवर २५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि या व्ह्यूज सतत वाढतच चालले आहेत. त्याचबरोबर गाण्याला २ लाख ६० हजार लाईक्सही मिळाल्या आहेत.

सपना चौधरीच्या ‘चटक मटक’ या गाण्याला तिच्या चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सपना चौधरीचं हे लेटेस्ट गाणं रेणुका पंवार या नवोदित गायिकेने गायलं आहे. त्याचबरोबर या गाण्याचे बोल बिट्टू सोरखी यांनी लिहिले असून संगीत गुलशन म्युझिकने दिलं आहे. युट्यूबवर सपना चौधरीचे फॅन कमेंट्समध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर या गाण्याचे बरेच लहान व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. गाण्यात रेणुकाचा आवाज आणि सपना चौधरीच्या नृत्यशैलीचं कौतुक होत आहे.

हरियाणवी चित्रपटांमध्ये करियर झाल्यानंतर सपना बिग बॉसमध्ये दिसली होती. बिग बॉसमधील तिच्या खेळीमुळे खूप धमाल झाली. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर लवकरच तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं. सपना चौधरीने आता बॉलिवूडमध्येही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून तिचा पहिला चित्रपट होता ‘दोस्ती के साइड इफेक्ट’.

हे देखील वाचा