Wednesday, April 30, 2025
Home बॉलीवूड गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी सलमान खानची चाहत्यांना खास भेट, आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर केले रिलीझ

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी सलमान खानची चाहत्यांना खास भेट, आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर केले रिलीझ

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चे मंगळवारी (७ सप्टेंबर) पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टर पाहून असे वाटते की, हा चित्रपट खूपच रंजक असणार आहे. या पोस्टरमध्ये दिसते की, सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत आहेत. सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरला चाहते पसंती करत असून त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.

पोस्टरची रचना खूपच संघर्षरीत्या दाखवण्यात आली आहे. ‘अंतिम’ चित्रपटाची कथा प्रामुख्याने एक पोलीस आणि एका गँगस्टरभोवती फिरते जी वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत. ‘अंतिम’ चित्रपट पूर्णपणे वेगवेगळ्या जगातील आणि विचारसरणीच्या दोन नायकांना एकत्र आणते. ज्यामुळे एक भयानक आणि अंगावर शहारा आणणारा शेवट दिसत आहे.

हा पोस्टर शेअर करत सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वाईटाच्या अंताची सुरुवात. गणपती बाप्पा मोरया.”

सलमान खान आणि आयुष शर्मा हे पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘अंतिम’ चित्रपट सलमान खान फिल्म्सद्वारा प्रस्तुत, सलमा खान निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित आहे. सलमान खान आजकाल परदेशात टायगर फ्रँचायझी ‘टायगर ३’ च्या तिसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच ‘टायगर ३’च्या सेटवरून सलमान खान आणि कॅटरिना कैफचे फोटो समोर आले होते. दोघांचे हे फोटो रशियातून व्हायरल झाले होते.

विशेष म्हणजे आयुष शर्माचा ‘अंतिम’ हा दुसरा चित्रपट आहे. यामध्ये तो सलमान खानसमोर रागीट लूकमध्ये दिसत आहे. चाहते दोघांचे देखील प्रचंड कौतुक करत आहेत. आयुष ‘अंतिम’मध्ये एक खतरनाक, मजबूत गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी आयुष शर्मा ‘लव्हयात्री’ चित्रपटात एका गुजराती मुलाच्या भूमिकेत दिसला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

हे देखील वाचा