Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड ‘साखरपुडा तर झाला, मिठाई तरी खायला दे’, साखरपुड्याच्या अफवांवर आई- वडिलांनी घेतली विकीची मजा

‘साखरपुडा तर झाला, मिठाई तरी खायला दे’, साखरपुड्याच्या अफवांवर आई- वडिलांनी घेतली विकीची मजा

मागील काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्या नात्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर अशा अफवा पसरल्या होत्या की, या दोघांनीही साखरपुडा केला आहे. अशातच विकी कौशलचा भाऊ सनीने कॅटरिना कैफसोबत साखरपुड्याच्या अफवांशी संबंधित एक रोचक किस्सा सांगितला आहे.

सनीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर अशी चर्चा होऊ लागली की, कॅटरिना आणि विकी यांचा साखरपुडा झाला आहे. “यानंतर जेव्हा विकी घरी आला, तेव्हा आई आणि वडिलांनी हसत हसत त्याला म्हटले की, ‘साखरपुडा तर झाला, मिठाई तरी खायला दे.'”

कॅटरिना रशियाला जाण्यापूर्वी उठल्या होत्या अफवा
गेल्या महिन्यात विकी करण जोहरच्या ‘मिस्टर लेले’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी काम करत आहे. कॅटरिना ‘टायगर ३’च्या शूटिंगची परदेशात तयारी करत होती.

कॅटरिना रशियाला जाण्याच्या एक दिवस आधी, अशी चर्चा होऊ लागली की, तिने विकी कौशलशी खूपच घाईघाईत साखरपुडा केला आहे. लवकरच रोकाचा विधीही  केला जाईल.

संपूर्ण कुटुंब साखरपुड्याच्या विषयावर हसले होते
सनी म्हणाला की, “या सर्व गोष्टी खोट्या आहेत. ज्या दिवशी या चर्चा होऊ लागल्या होत्या, त्या दिवशी विकी जिममध्ये गेला होता. अचानक आम्हालाही या चर्चेची माहिती मिळाली. जेव्हा तो परत आला, तेव्हा आई -वडील हसले आणि त्यांनी त्याला विचारले, ‘अरे यार साखरपुडा तर झाला, आता मिठाई तरी खायला दे.’ यावर विकीने उत्तर दिले की, ‘जेवढा खरा साखरपुडा झाला आहे, तेवढी खरी मिठाई खा.’ त्यानंतर आम्ही सर्वजण खूप हसलो. अशा गोष्टी कुठून येतात माहित नाही, पण आम्ही खूप हसलो.”

विकी आणि कॅटरिना त्यांच्या नात्यावर काहीच नाही बोलले
विकी कौशल आणि कॅटरिना कैफचे नाते मनोरंजन क्षेत्रात सतत चर्चेत असते. हे दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसतात. परंतु, दोघांनीही कधीही नात्याला अधिकृतपणे स्वीकारले नाही किंवा नाकारले नाही. अफवा पसरत असूनही, त्यांच्या भेटी थांबल्या नाहीत आणि जवळचे लोक असे मानतात की, त्यांचे नाते अधिक मजबूत होत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

हे देखील वाचा