Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड वाढदिवशी ‘खिलाडी’ अक्षय आईला करतोय खूपच मिस, भावुक पोस्ट करत म्हणाला, ‘आई तिथून…’

वाढदिवशी ‘खिलाडी’ अक्षय आईला करतोय खूपच मिस, भावुक पोस्ट करत म्हणाला, ‘आई तिथून…’

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार गुरुवारी (०९ सप्टेंबर) त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने इंस्टाग्रामवर आपल्या आईची आठवण करत एक भावनिक पोस्ट शेअर केली. खरं तर, त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर त्याची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले. आईशिवाय अक्षयचा हा पहिला वाढदिवस आहे.

या खास दिवशी अक्षयने त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याचसोबत कॅप्शन लिहिले की, “हे अशाप्रकारे कधीही आवडले नसते, पण मला खात्री आहे की, आई तिथून माझ्यासाठी वाढदिवसाचे गाणे गात असेल. तुम्हा सर्व लोकांच्या सहानुभूती आणि शुभेच्छांसाठी आभार. आयुष्य चालत आहे.” त्याचबरोबर अक्षयच्या या पोस्टवर चाहते आणि सेलेब्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. (Bollywood’s Khiladi Kumar miss his mother a lot on his birthday, emotional post)

अक्षयच्या आईचे काल झाले निधन
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे बुधवारी (०८ सप्टेंबर) सकाळी मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात निधन झाले. अक्षय कुमारने एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. खरं तर, अरुणा या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत नसल्याचे पाहून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कुटुंबासोबत असायचा अक्षय
अक्षय कुमार सुरुवातीपासूनच त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, त्याने नेहमीच त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या कुटुंबाला दिले. मात्र, आज आईला गमावल्यानंतर अक्षयसाठी दुःखाचा क्षण आहे. खरं तर, अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ होता आणि त्याने याबद्दल अनेक वेळा सांगितले होते.

अक्षयचा जन्म
अक्षय कुमारचा जन्म ९ सप्टेंबर, १९६७ रोजी अमृतसर येथे झाला. त्याचे खरं नाव राजीव ओम भाटिया असे आहे. अक्षय कुमारला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हटले जाते. अक्षयने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आणि आज त्याचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट कोटींची कमाई करतो.

सौगंध चित्रपटाद्वारे पदार्पण
अभिनेता अक्षय कुमारने ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेता पदार्पण केले, पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख ‘खिलाडी’ या चित्रपटाद्वारे मिळाली. यानंतर अक्षयने ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘इंटरनेशनल खिलाडी’, ‘खिलाडी ४२०’, ‘हेरा फेरी’, ‘अजनबी’, ‘रुस्तम’, ‘बेबी’, ‘गुड न्यूज’, ‘बेलबॉटम’ असे अनेक चित्रपट केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा