Wednesday, February 5, 2025
Home भोजपूरी रितेशचं ‘दिलवा लव यू बोलता’ गाणं रिलीझ; पण चाहत्यांना नाही आवडली अक्षरासोबतची केमिस्ट्री

रितेशचं ‘दिलवा लव यू बोलता’ गाणं रिलीझ; पण चाहत्यांना नाही आवडली अक्षरासोबतची केमिस्ट्री

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग ही ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून परतली आहे. त्याचबरोबर अभिनेता रितेश पांडे आणि अभिनेत्री अक्षरा सिंग यांचं एक गाणं प्रदर्शित झाले आहे. यांचे ‘दिलवा लव यू बोलता’ या भोजपुरी गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात या दोन्ही कलाकारांमधील जबरदस्त केमिस्ट्री आणि वादविवाद पाहायला मिळत आहेत.

रितेश पांडे आणि अक्षरा सिंग यांच्या भोजपुरी ‘दिलवा लव्ह यू बोलता’ गाण्याचा व्हिडिओ एंटर १० रंगीलाच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. बुधवारी (०८ सप्टेंबर) यूट्यूबवर त्याचा प्रीमियर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ९० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एवढेच नाही तर जवळपास २ हजार लाईक्स देखील मिळाले आहेत. रितेश पांडे आणि अक्षरा सिंग यांची प्रसिद्धी पाहिली, तर त्यानुसार हे व्ह्यूज आणि लाईक्स खूपच कमी आहेत. यावरून समजते की, चाहत्यांना तिचे हे गाणे फारसे आवडलेले नाही. (Akshara and Ritesh song ‘Dilwa Love You Bolta’ release)

नुकतेच रितेशचं ‘खईके पान बनारस वाला’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला प्रदर्शित होताच लाखो लाईक्स मिळाले होते. तसेच आता हे गाणे १८ व्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

जर अभिनेत्री अक्षरा सिंग आणि अभिनेता रितेशच्या ‘दिलवा लव्ह यू बोलता’ या गाण्याच्या चित्रीकरणाबद्दल बोलायचे झाले, तर या दोन कलाकारांमध्ये गमतीशीर वादविवाद होताना दिसून येत आहे. ते एकमेकांच्या प्रेमातही पडलेले दिसतात. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा खोडकरपणा दाखवण्यात आला आहे, जो जबरदस्त दिसत आहे. हे गाणे दोन्ही स्टार्सच्या आगामी ‘मजनूआ’ या भोजपुरी चित्रपटातील आहे.

हे गाणं रितेश पांडे, नीलकमल सिंग आणि सलोनी भारद्वाज यांनी गायले आहे. हे गाणं आर. आर. पंकज यांनी लिहिले आहे. निर्माता जगत बिहारी आणि दिग्दर्शक आशिष यादव आहेत. त्याचबरोबर मधुकर आनंद यांनी संगीत दिले आहे.

त्याचबरोबर, जर या चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता रितेश आणि अभिनेत्री अक्षरा व्यतिरिक्त, सुशील सिंग, बिपीन सिंग, देव सिंग, प्रकाश जैश आणि लोता तिवारी हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा