मनी लाँड्रिंग आणि ड्रग्ज प्रकरणात दक्षिणचा सुपरस्टार रवी तेजा हैदराबादच्या अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाला. रवी तेजा, पुरी जगन्नाथ, चार्ममे कौर, रकुलप्रीत सिंग, नंदू आणि राणा दग्गुबती यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
रवी तेजा याच्यासह त्याचा ड्राइव्हर श्रीनिवासलाही ईडीने समन्स पाठवले होते. या प्रकरणाची चौकशी गुरुवारी (९ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजता सुरू झाली. चौकशीसाठी आलेले कलाकार त्यांच्यासोबत बँक स्टेटमेंट घेऊन आले होते. तर रकुल फाईल्स घेऊन जाताना दिसली. त्याचवेळी राणा दग्गुबतीकडे लॅपटॉप होता. रवी तेजा आपल्या चार्टर्ड अकाउंटंटसह येथे आला होता. रवीला इडीला सांगायचे आहे की, कथितरित्या केल्विन नावाच्या व्यक्तीकडे आणि परदेशातील इतर खात्यांमध्ये पैसे का गेले.
अभिनेत्याची २०१७ मध्ये शहरातील ड्रग्सच्या कथित सहभागाबद्दल १० तास चौकशी केली गेली होती. केल्विनला बोलावून घेतले आहे, तर नंदू आणि राणा दग्गुबती यांच्यासोबत संयुक्तपणे चौकशी केली आहे. रवी तेजाचा भाऊ यापूर्वी ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी ठरलेला आहे. मात्र, रवी तेजाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ही चौकशी दिवसाच्या शेवटीपर्यंत सुरू होती.
जेव्हा रवी तेजा ईडी कार्यालयात पोहोचला आणि माध्यमांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अभिनेता काहीही उत्तर न देता आत गेला. अभिनेत्याची किती तास चौकशी केली गेली, हे अद्याप समोर आले नाही. रवी तेजा मीडियाचे प्रश्न टाळण्यासाठी त्याच्या घराऐवजी थेट त्यांच्या फार्महाऊसवरून ईडीच्या कार्यालयात गेला. पण त्याला माध्यमांनी घेरले. यापूर्वी संबंधित प्रकरणात, रकुलप्रीत सिंगसह अनेक कलाकार ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिसल्या सायरा बानो; हातात होता दिलीप कुमारांचा फोटो
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’










