Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड प्रतिक गांधीच्या ‘रावण लीला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहायला मिळाला अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज

प्रतिक गांधीच्या ‘रावण लीला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहायला मिळाला अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज

देवांमध्ये झालेले युद्ध, कृष्ण आणि राधा तसेच राम- सीता यांची प्रेम कहाणी आपण अनेक चित्रपटांमध्ये पहिली आहे. देवतांच्या या रास लीलेला धरून अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रेम कहाण्या दाखवल्या जातात. अशात अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘रावण लीला’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (०९ सप्टेंबर) प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरविषयी बोलायचे झाले, तर या चित्रपटाचा ट्रेलर ‘पेन मुव्हीज’ या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये ऐंद्रिता रे ,अंकुर भाटिया, अभिमन्यु सिंग, राजेश शर्मा, अंकुर विकल, राजेंद्र गुप्ता, गोपाल सिंग, फ्लोरा सैनी, अनिल रस्तोगी, कृष्णा बिष्ट आणि भाग्यश्री मोटे आदी कलाकार आहेत. ऐंद्रिता रे आणि प्रतीक गांधी यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये प्रतिकचा रोमँटिक अंदाज दाखवला आहे. तसेच चित्रपटात तो अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार हे. सुरुवातीला ज्या गावामध्ये कधी साधं नाटक नाही झालं, तिथे पूर्ण रामलीला होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर पूर्ण ट्रेलरमध्ये रावण, राम आणि सीता या तिघांवर नाटक बनवण्याचे काम सुरू आहे. तसेच ऐंद्रिता आणि प्रतीक यांची प्रेम कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे. सर्वजण त्यांच्या नात्याला विरोध करताना दिसत आहेत. शेवटी प्रतीकचा राम आणि रावण यांच्यावर एक जबरदस्त डायलॉग आहे. हा चित्रपट १ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रतीक याआधी अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये झळकला आहे. परंतु त्याचा अभिनय ‘स्कॅम १९९२’ मध्येच चमकला. यातील त्याच्या भूमिकेने आणि डायलॉगने तरुणाईला पुरते वेड लावले. ‘रिस्क हैं तो इस्क हैं’ यासह बाकीच्या डायलॉगने आणि प्रभावी अभिनयाने तो ओळखला जाऊ लागला. ‘अतिथी भूतो भव’ या चित्रपटाची अभिनेत्री दिविना ठाकुरने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “प्रतीकला ‘स्कॅम १९९२’ चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली असेल, परंतु त्याने नाट्यगृह आणि चित्रपटांमध्ये भरपूर काम केले आहे. तो वरुण धवनबरोबर देखील एका चित्रपटामध्ये झळकला आहे. असं नाहीये की, त्याला या वेबसीरिज नंतरच प्रसिद्धी मिळाली आहे. प्रतीकचे जे शो व्यासपीठावर व्हायचे ते ‘स्कॅम १९९२’ आधी पण हाऊसफुल व्हायचे.” प्रतिकने झाशीमध्ये ‘डेढ बीघा जमीन’ या चित्रपाची शूटिंग सुरू केली आहे. या चित्रपटामध्ये खुशाली कुमार मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

ऑगस्ट महिन्यामध्येच ‘रावण लीला’ या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रतीक अभिनेत्रीबरोबर बासरी वाजवतानाची पोझ देत होता. तसेच पोस्टरच्या बॅकग्राऊंडमध्ये प्रतीक रावणच्या पोशाखात होता. ऐंद्रिता रेचा देखील हिंदी भाषिक हा प्रथम चित्रपट आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा