चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी सर्व अभिनेते आणि अभिनेत्री सुंदर आणि आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते खूप परिश्रम घेतात. वेगवेगळ्या ब्रँडचे मेकअप, जिम, आकर्षक शरीरासाठी महागडे इंजेक्शन आणि शस्त्रक्रिया देखील करतात. काहींना हे सर्व करून देखील चित्रपटांमध्ये काम मिळत नाही. त्यामुळे अनेक कलाकार नैराश्यामुळे टोकाचे पाऊलही उचलतात. अशात काही अभिनेत्रींना त्यांच्या काळ्या रंगावरून हिनवले जाते. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री ईशा गुप्ताबरोबर घडला होता.
अभिनेत्रीने सिनेसृष्टीमध्ये यायचे ठरवले, तेव्हा तिला तिच्या रंगावरून कमी लेखण्यात आले होते. त्यावेळी ज्या अभिनेत्रींनी तिच्याबरोबर कामही केलेले नाही त्या देखील तिला गोरी होण्याचे सल्ले द्यायच्या. अभिनेत्रीने ‘जन्नत २’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (I did not get work in the early days because of looking black stars used to advice me to do fair makeup says isha gupta)
बॉलिवूडमध्ये मला माझा काळा रंग लपवायला सांगितला होता
एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशाने सांगितले की, “एक काळ होता जेव्हा मेकअप आर्टिस्ट मुद्दाम माझा काळा रंग लपवण्याचा प्रयत्न करत होते. कारण मला माझ्या रंगावरून ‘बोल्ड अभिनेत्री’ म्हणून पाहिले जात होते. मला अजूनही आठवत आहे, जेव्हा मी सुरुवातीला बॉलिवूडमध्ये आले होते, तेव्हा ज्या अभिनेत्रींनी माझ्याबरोबर कामही केले नाही, त्या देखील मला गोरा मेकअप करत जा असं म्हणायच्या.”
एक ना एक दिवस हे सगळं नक्की बदलेल
पुढे ईशा म्हणते की, “मी दोन मल्टी-स्टारर चित्रपट केले आहेत, पण ते म्हणाले तू सेक्सी आहेस कारण तुझा रंग काळा आहे. माझ्या त्वचेचा जो रंग आहे त्याला माझ्या देशामध्ये काळं म्हटल जातं. ज्या काळ्या मुली आहेत त्या फक्त सेक्सी आणि नकारात्मक भूमिकांसाठी आहेत आणि ज्या गोऱ्या आहेत त्या सुसंकृत भूमिकांसाठी आहेत. मला आशा आहे की, हे सर्व काही लवकरच बदलेल.”
ईशाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या दमदार अभिनयाने तिने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तिने आपल्या दमदार अभिनयाने पुरस्कार देखील मिळवले आहेत. ‘स्टारडस्ट अवॉर्ड फॉर बेस्ट एक्टरेस’ची देखील ती मानकरी आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’