आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे. सगळ्यांनी अगदी भक्तीभावाने आणि उत्साहाने गणरायाचे स्वागत केले आहे. गणपती आला की, सगळ्यांच्या आवडीची गोष्ट म्हणजे वेगवेगळे देखावे. गणपती येण्याच्या चार-पाच दिवस आधीपासूनच या देखाव्याची तयारी चालू झालेली असते. अशातच मराठी कलाकारांच्या घरात बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात त्यांच्या बाप्पाचे देखावे पाहायला मिळत आहेत. अशातच मराठी अभिनेता सुबोध भावे याच्या घरच्या बाप्पाचा देखावा बघण्यासारखा आहे.
सुबोध भावेने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या घरच्या बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. त्याने त्याच्या बाप्पाचा एक वेगळ्या आणि खास पद्धतीने देखावा केला आहे. या देखाव्यात त्याने टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेत भारतातील विजयी स्पर्धकांचे फोटो लावले आहेत. एक आगळा-वेगळा विचार करून त्याने हा देखावा तयार केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुबोध त्याच्या घरातील बाप्पासोबत दिसत आहे. (Marathi actor subodh bhave share his ganapti photo on social media with unique concept)
हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “गणपती बाप्पा मोरया! बाप्पाचे आगमन म्हणजेच आनंद आणि समाधान. या वर्षीचा आमचा देखावा टोकियो ऑलिंपिक २०२० भारतासाठी पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचं खूप कौतुक.” त्याची ही वेगळी कल्पना त्याच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकारांना देखील आवडली आहे. त्याच्या या फोटोवर अनेक कलाकार कमेंट करून या कल्पनेचे कौतुक करत आहेत.
या फोटोवर आभिज्ञा भावे हिने “अप्रतिम कन्सेप्ट,” अशी कमेंट केली आहे. तसेच नंदिता पाटकर हिने “आईला भारी,” अशी कमेंट केली आहे. यासोबत ऋतुजा बागवे, आशुतोष गोखले, सायली संजीव, भाग्यश्री लिमये या कलाकारांनी कमेंट करून त्याचे खूप कौतुक केले आहे.
यावर्षी टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताच्या नावे ७ पदके झाली आहेत. यात नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू हिने रौप्यपदक मिळवले आहे. कुस्तीमध्ये रवी कुमार दहिया याने रौप्यपदक मिळवले आहे. बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू हिने कांस्यपदक मिळवले आहे. बॉक्सिंगमध्ये लवलिना बोर्गोहेन हिने कांस्यपदक मिळवले आहे. तसेच कुस्तीमध्ये बजरंग पुनिया याने कांस्यपदक मिळवले आहे, तर हॉकीमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. या सगळ्या स्पर्धकांचे फोटो वापरून सुबोध भावेने गणपतीचा देखावा केला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा
-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?
-‘बिग बॉस १५’च्या पहिल्या स्पर्धकाचे नाव आले समोर, टीव्हीची ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री घेणार सहभाग